सर्वाधिक प्रवेशासाठी पंढरपूरच्या आयआयटीचा एमकेसीएलकडून गौरव

 सर्वाधिक प्रवेशासाठी पंढरपूरच्या आयआयटीचा एमकेसीएलकडून गौरव




पंढरपूर : सन २०२४ मध्ये पंढरपूर येथील आयआयटी कॉम्प्युटर सेंटरला एमएससीआयटी संगणक कोर्ससाठी महाराष्ट्रातून सर्वाधिक प्रवेश दिल्याबद्दल महाराष्ट्र ज्ञान महामंडळ म्हणजेच एमकेसीएलकडून राज्यस्तरीय नंबर १ चा दिला जाणारा सर्वोत्कृष्ठ प्रशिक्षण संस्था पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

महाराष्ट्र ज्ञान महामंडळाची विभागीय बैठक सोलापूर येथील निर्मलकुमार फडकुले सभागृहात दि. ३ डिसेंबर रोजी पार पडली. हा पुरस्कार एमकेसीएलच्या मॅनेजिंग डायरेक्टर वीणा कामथ यांच्या हस्ते देण्यात आला. हा पुरस्कार आयआयटी कॉम्युटर सेंटरचे संचालक नितीन आसबे व दत्ता कळकुंबे यांनी स्वीकारला. पंढरपूर येथील आयआयटी संगणक प्रशिक्षण संस्था मागील २४ वर्षांपासून पंढरपूर येथे विद्यार्थ्यांना संगणकाचे धडे देत आहे. यापूर्वीही या संस्थेला अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. यावर्षी एमएस-सीआयटी रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करीत विद्यार्थी हिताचे प्रसिक्षण दिले. शासनाकडून आलेले सारथी, अमृतकलश, यासारखे वेगवेगळे प्रशिक्षण सर्वसामान्य गोरगरीब होतकरू विद्यार्थाना देवून नोकरीला लावले व विद्यार्थांचा विश्वास संपादन केल्या बद्दल सन्मान करण्यात आला.  

 या यशामागे रोहिणी मांजरे, वैष्णवी पाटील व आयआयटी संगणक प्रशिक्षण संस्थेतील इतर शिक्षकांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. पुरस्कार प्रदान करतेवेळी एमकेसीएलचे विभागीय सरव्यवस्थापक अतुल पतोडी, अमित रानडे, डॉ. दीपक पाटेकर, श्री.कौशल, श्री.कुंभार,श्री.कटकधोंड, विभागीय समन्वयक श्री महेश पत्रीके, लोकल लीड सेंटर चे रोहित जेऊरकर, हारून शेख, मलिक शेख, शिवानंद पाटील व सोलापूर जिल्ह्यातील सर्व संगणक संस्था चालक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad