येत्या शनिवारी स्वेरीत ‘ऋणानुबंध-२०२४’ या माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन



येत्या शनिवारी स्वेरीत ‘ऋणानुबंध-२०२४’ या माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन




पंढरपूरः गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरी संस्थेच्या अंतर्गत असलेल्या सर्व महाविद्यालयांतील माजी विद्यार्थ्यांचा ‘ऋणानुबंध-२०२४’ हा मेळावा येत्या शनिवार, दि.०७ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ११:०० वाजता स्वेरीच्या प्रांगणात आयोजित केला आहे. यासाठी स्वेरीतून शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे.’ असे आवाहन स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी केले आहे.

     डिप्लोमा, डिग्री अभियांत्रिकी, फार्मसी व एमबीए चे शिक्षण झाल्यानंतर विद्यार्थी हे विविध ठिकाणी नोकरीच्या निमित्ताने स्थायिक होतात. गोपाळपूरच्या माळरानावर जिथे विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले त्या ठिकाणी होणाऱ्या या ‘ऋणानुबंध २०२४’ या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात मनमुराद चर्चा, आपापसांत सुसंवाद, नव्या विचारांबरोबरच जुन्या आठवणींच्या शिदोरीची देवाण-घेवाण होणार असून आपण काम करत असलेल्या कंपनीत अथवा नोकरीत येत असलेले अनुभव यांचीही देवाण घेवाण होणार आहे. स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे, स्वेरी इंजिनिअरिंगच्या माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष गुरुप्रसाद तेलकर, उपाध्यक्ष दत्तात्रय घोडके व सचिव प्रा. अविनाश मोटे यांनी सर्व माजी विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे.’ असे आवाहन केले आहे. सदर मेळाव्यातून जुन्या आठवणींना उजाळा मिळणार आहे तसेच गतकाळात घडलेल्या प्रमुख घटनांचा आढावाही घेण्यात येणार आहे. या मेळाव्यात पदवी अभियांत्रिकीच्या स्थापनेपासून म्हणजे १९९८ पासून ते गतवर्षीपर्यंत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी सहभागी होणार आहेत. स्वेरीमध्ये इंजिनिअरींगचे शिक्षण पुर्ण केल्यानंतर नोकरीच्या निमित्ताने विद्यार्थी पुणे, मुंबई, बेंगलोर तसेच भारतातील अन्य प्रमुख शहरांमध्ये व परदेशात स्थायीक झालेले माजी विद्यार्थी या मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहेत. एकूणच ‘ऋणानुबंध २०२४’ च्या निमित्ताने येत्या शनिवारी (दि.०७ डिसेंबर) पुन्हा एकदा स्वेरीतील जुना चिवचिवाट मात्र नव्याने घुमणार आहे हे मात्र नक्की! माजी विद्यार्थी मेळाव्यासंबंधी अधिक माहीतीसाठी ९९२३४०३७०८, ९८८१७७६१९६, ९९७५३९१०४८ व ९९७०८४९५८८ या क्रमांकावर संपर्क साधावा.’ असे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.