*पंढरपूर सिंहगडचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे आदर्श प्राचार्य पुरस्काराने सन्मानित*
पंढरपूर: प्रतिनिधी
बांधिलकी समजिकतेची लढा शिक्षणाचा हे ब्रीद वाक्य घेवून समाजात काम करणाऱ्या व्यक्तीस महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीच्या माध्यमातून जिल्हास्तरीय कृतिशील शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा रविवार दिनांक १ डिसेंबर २०२४ रोजी पंढरपूर सिंहगड इंजिनिअरिंग काॅलेज मध्ये पार पडला.
या कार्यक्रमप्रसंगी माजी आमदार दत्तात्रय सावंत यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यामध्ये पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या माध्यमातून होणारे विविध सामाजिक उपक्रम, रोटरी क्लब पंढरपूरच्या माध्यमातून होणारे विविध कार्यक्रम, पंढरपूर व परिसरातील विविध सामाजिक संघटना यांच्या साठी केलेले काम, या सर्व कामांचे प्रतिक म्हणून हा पुरस्कार दिल्याचे मत या वेळी आयोजन समिती करून देण्यात आले.
यावर्षी महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीच्या माध्यमातून दिला जाणारा आदर्श प्राचार्य पुरस्कार डाॅ. कैलाश करांडे यांना देऊन सन्मानित करण्यात आले. यादरम्यान मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे म्हणाले शिक्षकांच्या व महाविद्यालयातील विविध प्राध्यापकांचे विविध प्रश्न सोडवण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य कृती समितीच्या सोबत राहून काम करण्याची आवश्यकता असल्याचे मत या वेळी प्राचार्य डॉ. कैलाश करांडे सर यांनी व्यक्त केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी परीश्रम घेतले.
आदर्श प्राचार्य पुरस्कार स्विकारताना प्राचार्य डॉ. कैलाश करांडे सह पत्नी निशा करांडे व मान्यवर