स्वेरीज् कॉलेज ऑफ फार्मसीच्या ८ विद्यार्थ्यांची ‘एव्हर्टोजेन फार्मा प्रा. लि.’ मध्ये कॅम्पस इंटव्हूवद्वारे निवड


स्वेरीज् कॉलेज ऑफ फार्मसीच्या ८ विद्यार्थ्यांची

‘एव्हर्टोजेन फार्मा प्रा. लि.’ मध्ये कॅम्पस इंटव्हूवद्वारे निवड



पंढरपूरः ‘गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टीटयूट संचलीत कॉलेज ऑफ फार्मसी तथा बी. फार्मसी महाविद्यालयातील ०८ विद्यार्थ्यांची हैदराबाद येथील ‘एव्हर्टोजेन फार्मा प्रायव्हेट लिमिटेड’ या औषध निर्मिती क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीत कॅम्पस इंटरव्यूव्हमधून निवड करण्यात आली आहे.’ अशी माहिती बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. मिथुन मणियार यांनी दिली.

      हैदराबाद येथील ‘एव्हर्टोजेन फार्मा प्रायव्हेट लिमिटेड’ या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीचे व्यवस्थापक राजेश किणगे, एच.आर. नवीनकुमार जोगी व त्यांच्या निवड समितीने स्वेरीच्या स्वेरीज् कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयात दि.१५ नोव्हेंबर २०२४ रोजी येऊन घेतलेल्या इंटरव्यूव्हमधून डी. फार्मसी व बी. फार्मसी च्या एकूण ०८ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. गुणात्मक अभ्यासाबरोबरच कमालीची शिस्त, आदरयुक्त संस्कृती व उत्कृष्ठ शिक्षण पध्दती यामुळे निवड समिती अत्यंत प्रभावीत झाली. निवड समितीच्या अंतिम प्रकियेतून फार्मसीच्या अंतिम वर्षात शिक्षण घेणारे प्रतिक शिवराज खराडे, मिनाज रफिक तांबोळी, दिव्या महादेव बोराडे, प्राची सुकुमार अवचर, सुश्मिता चंद्रकांत कांबळे, प्रतिका राजेंद्र सुरवसे, सुशांत शंकर मुसमुसे आणि ऋतुजा उमेश पंके या ०८ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. अभियांत्रिकी महाविद्यालयाला आलेल्या भरघोस यशानंतर पालकांच्या मागणीनुसार २००६ साली फार्मसी महाविद्यालयाची स्थापना झाली. अभियांत्रिकीच्या पाऊलांवर पाऊल ठेवून फार्मसी मध्ये देखील यशस्वी वाटचाल सुरु आहे. प्रत्येक वर्षी वार्षिक परीक्षेमध्ये उकृष्ठ निकाल, विद्यार्थ्यांचे प्लेसमेंट होण्याच्या संख्येत लक्षणीय वाढ आदी बाबी विद्यार्थ्यांच्या करिअरला पोषक अशा आहेत. कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. मिथुन मणियार यांनी सांगितले की, ‘आमचा विद्यार्थ्यांसाठी कॅम्पस ड्राईव्ह आयोजित करण्याचा उद्देश, त्यांना उत्तम करिअर संधी उपलब्ध करून देणे आहे. ‘एव्हर्टोजन’ फार्मासारख्या प्रतिष्ठित कंपनीने आमच्या विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळाव्यात यासाठी आमच्या विनंतीचा स्वीकार करून कॅम्पस ड्राईव्ह घेण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद मिळाला.’ या कॅम्पस ड्राईव्ह मधील यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य डॉ. मिथुन मणियार व फार्मसीचे ट्रेनिग अँड प्लेसमेंट इन्चार्ज प्रा. कोमल परचंडे व टी.पी.ओ. समन्वयक प्रा.प्रदीप जाधव यांच्या नेतृत्वाखाली इतर प्राध्यापकांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना प्लेसमेंटमध्ये देखील यश मिळत आहे. यामुळे विद्यार्थ्यांबरोबरच पालकांमध्येही आनंदाचे वातावरण पसरले आहे. संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. बी.पी. रोंगे, अध्यक्ष दादासाहेब रोंगे, उपाध्यक्ष हनीफ शेख, संस्थेचे इतर पदाधिकारी व विश्वस्त, स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम.एम.पवार, प्राचार्य डॉ. मिथुन मणियार, इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थ्यांनी व पालकांनी कंपनीत निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad