*पंढरपूर सिंहगड मधील इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांची माने इलेक्ट्रिकल वेहिकल कंपनीला भेट*
पंढरपूर: प्रतिनिधी
एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर महाविद्यालयातील इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागात अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी माने इलेक्ट्रिकल वेहिकल पकालपूर येथे भेट दिली असल्याची माहिती प्राचार्य डॉ कैलाश करांडे यांनी दिली.
इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागाने अंतीम वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी माने इलेक्ट्रिकल ला औद्योगिक भेट हि शुक्रवार दिनांक ६ सप्टेंबर २०२४ रोजी आयोजित केली होती.
या भेटीचा मुख्य उद्देश इलेक्ट्रिकल वेहिकल व हायब्रीड चे वर्किंग व कंट्रोलिंग कसे चालते याची माहिती घेणे हा होता. या भेटीतून विद्यार्थ्यांना इलेक्ट्रिकल वेहिकल व हायब्रीड वेहिकल चे माहिती व बॅटरी मॅनेजमेंट सिस्टीम कंट्रोलर याबद्दल सखोल माहिती साईट इंजिनिअर यांनी दिली.
या औद्योगिक भेटीसाठी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातील ६० हुन अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
ही औद्योगिक भेट यशस्वी करण्यासाठी विभागप्रमुख प्रा. व्ही. पी. मोरे, औद्योगिक भेट समन्वयक प्रा. पी. बी. व्यवहारे, प्रा. ए.आर मासाळ, तृप्ती कदम सह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.