*पंढरपूर सिंहगडच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागात पालक मेळावा उत्साहात संपन्न*
पंढरपूर: प्रतिनिधी
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मधील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागात शुक्रवार दिनांक ६ सप्टेंबर २०२४ रोजी पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता. हा पालक मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला असल्याची महिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
या पालक मेळाव्याचे उद्घाटन पालक प्रतिनिधी मोहन जाधव, इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ. अल्ताफ मुलाणी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर आदींच्या हस्ते सरस्वती पूजन करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. दरम्यान पालक प्रतिनिधी मोहन जाधव यांचा डाॅ. अल्ताफ मुलाणी यांचे हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
या मेळाव्यात डाॅ. अल्ताफ मुलाणी, डॉ. समीर कटेकर आदींनी उपस्थित विद्यार्थी व पालकांना इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागाचा शैक्षणिक आढावा सादर केला. दरम्यान पालक प्रतिनिधी मोहन जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. या मेळाव्यात यशस्वी विद्यार्थ्यांचे गुलाब व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
हा मेळावा यशस्वी करण्यासाठी प्रा. अनिता शिंदे, प्रा. अविनाश हराळे, प्रा. वैष्णवी उत्पात, प्रा. स्वप्निल टाकले आदींसह इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. ह्या मेळाव्याचे सुञसंचलन वरदा बिडकर व सानिका बाबर यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. अनिता शिंदे यांनी मानले.