पंढरपूर सिंहगडचे प्रा. अनिल जाधव यांना बेस्ट टिचर अवॉर्ड

 *पंढरपूर सिंहगडचे प्रा. अनिल जाधव यांना बेस्ट टिचर अवॉर्ड*




पंढरपूर; प्रतिनिधी



कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मध्ये ५ सप्टेंबर २०२४ रोजी शिक्षक दिनानाचे औचित्य साधून बेस्ट टिचर अवॉर्ड देण्यात येत असतो. यावर्षीचा बेस्ट टिचर अवॉर्ड मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागात कार्यरत असलेले प्रा. अनिल जाधव यांना नुकताच मान्यवरांच्या हस्ते शाल, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरव आले अशी माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.

   एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये शिक्षक दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डाॅ. मोहन देशपांडे हे उपस्थित होते.

   सिंहगड इंजिनिअरिंग काॅलेजच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील प्रा. अनिल जाधव यांना चालू वर्षांतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल प्रमुख पाहुणे डाॅ. मोहन देशपांडे, प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ. श्याम कुलकर्णी आदींच्या हस्ते सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. 

   प्रा. अनिल जाधव यांना बेस्ट टिचर अवॉर्ड मिळाल्याबद्दल महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षेकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.



फोफो ओळी: सिंहगड काॅलेज मधील प्रा. अनिल जाधव यांना बेस्ट टिचर अवॉर्ड प्रदान करताना डाॅ. मोहन देशपांडे, प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, डाॅ. श्याम कुलकर्णी आदी.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad