सिंहगड पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेज केगाव सोलापूर येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा
सोलापूर/ प्रतिनिधी
दि. 5 सप्टेंबर 2024 रोजी सिंहगड पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेज केगाव सोलापूर येथे शिक्षक दिन तसेच डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. शाळा सुरू झाल्यानंतर ते सुटेपर्यंत दिवसभराचे नियोजन सांस्कृतिक विभाग, विद्यार्थी परिषद सदस्य, व इयत्ता 10 वी च्या विद्यार्थ्यांनी केले होते. या विशेष प्रसंगी, शाळेतील सर्व कामकाज विद्यार्थ्यांद्वारे पार पाडले गेले. काही विद्यार्थ्यांनी संस्थेचे कॅम्पस डायरेक्टर, प्राचार्या, उपप्राचार्य, शिक्षक, ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक, क्लार्क, आणि अकाउंटंट या भूमिका साकारल्या, ज्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेतील कामकाजाचा अनुभव घेण्याची संधी मिळाली.
शिक्षक दिनाची सुरुवात शिक्षकांद्वारे घेतलेल्या परिपाठाने झाली, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना आपल्या जीवनातील शिक्षकांचे महत्त्व पटवून दिले गेले. यानंतर, शिक्षकांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, ज्यात शिक्षकांचा रॅम्प वॉक, पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू म्हणून झाड देऊन स्वागत करण्यात आले. 'एक शिक्षक एक झाड' या संकल्पनेअंतर्गत शिक्षकांना झाड देण्यात आले. विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले तसेच शिक्षकांसाठी मनोरंजक खेळ प्रकारही घेण्यात आले. या सर्व उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांनी शिक्षकांसाठी अविस्मरणीय असा दिवस साजरा केला.
या कार्यक्रमाचे आयोजन कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय नवले सर यांच्या मार्गदर्शनाखाली झाले, तसेच प्राचार्या निखहत शेख, उपप्राचार्य प्रकाश नवले, शिक्षक, आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.