*विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत पालकांची भुमिका महत्वपूर्ण- डाॅ. स्वानंद कुलकर्णी*
*पंढरपूर सिंहगडच्या सिव्हिल इंजिनीअरिंग विभागात पालक मेळावा उत्साहात*
पंढरपूर: प्रतिनिधी
विद्यार्थ्यांच्या प्रगतीमध्ये सातत्यपूर्ण अभ्यास महत्वाचा असतो. आपल्या पाल्याच्या प्रगतीचा आलेख पाहण्याची संधी पालक मेळाव्यात उपलब्ध होत असते. पालक मेळावा म्हणजे महाविद्यालयात मुलांच्या प्रगतीचा आलेख तसेच प्रगतीवर चर्चा करण्यात येत असते. यामुळे महाविद्यालयाकडून पालकांच्या अपेक्षा, सामाजिक व शैक्षणिक संवाद यासह अनेक विषयांवर होत असते यासाठी विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत शिक्षकांबरोबर पालकाचीही भूमिका महत्वपूर्ण असते असे मत डाॅ. स्वानंद कुलकर्णी यांनी पालक मेळाव्यात बोलताना व्यक्त केले.
एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मधील सिव्हिल इंजिनीअरिंग विभागात शुक्रवार दिनांक ६ सप्टेंबर २०२४ रोजी पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता. या पालक मेळाव्याची सुरवात मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पुजन करून दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यादरम्यान पालक प्रतिनिधी दिलीप कवडे यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळेस विद्यापीठाच्या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र व गुलाब देऊन सन्मानित करण्यात आले.
सिव्हिल इंजिनिअरिंग विभागाचा शैक्षणिक आढावा उपस्थित पालकांसमोर विभाग प्रमुख डॉ. श्रीगणेश कदम यांनी सादर केला. या मेळाव्याचे सुञसंचलन व आभार प्रदर्शन डाॅ. यशवंत पवार यांनी केले. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी प्रा. नामदेव लकडे, प्रा. चंद्रकांत देशमुख, प्रा. अमोल कांबळे, प्रा. अजित करांडे, प्रा. सिद्धेश पवार, प्रा. मिलिंद तोंडसे, प्रा. निखत खान, बाळासो शेंडे, अमित करांडे, कविता पाटील, सूर्यकांत जाधव आदींसह सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.