महिलांच्या सुरक्षेसाठी राज्यात 'शक्ती' कायदा लागू करावा: साहिल शेख

 महिलांच्या सुरक्षेसाठी राज्यात 'शक्ती' कायदा लागू करावा: साहिल शेख



पंढरपूर/ प्रतिनिधी 

महाराष्ट्र राज्यात मागील काही दिवसांमध्ये महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असून राज्यातील महायुती सरकारने लवकरात लवकर 'शक्ती' कायदा लागू करून महिलांच्या संरक्षणाचे कवच आणखी मजबूत करावे, अशा पद्धतीचे मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष समाधान दादा काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांना पंढरपूर दौऱ्यावर आल्या असता पत्राद्वारे केली.


महिलांच्या सुरक्षेसाठी आणि शक्ती कायद्यासंदर्भात राज्यातील महायुती सरकार संवेदनशील असून यामधील अडचणी दूर करून केंद्र सरकारच्या मदतीने आपण हा कायदा राज्यामध्ये लवकरच लागू करणार असल्याचे आश्वासन यावेळी मंत्री आदितीताई तटकरे यांनी दिले.


तसेच महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी राज्यातील महायुती सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी आदितीताईंचे आभार मानले.


यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांतिक सदस्य कल्याणरावजी काळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत दादा कदम, युवक प्रदेश सरचिटणीस श्रीकांत आबा शिंदे,महिला जिल्हाध्यक्ष वर्षाताई शिंदे,महिला शहराध्यक्ष संगीताताई जोगदंड,पंढरपूर तालुकाध्यक्ष अनिल दादा नागटिळक टिळक, विद्यार्थी प्रदेश सरचिटणीस महेश बोचरे,युवकचे जिल्हाध्यक्ष अभिषेक आव्हाड, कार्याध्यक्ष अक्षय भांड, विद्यार्थीचे सरचिटणीस वंशभूषण शिंदे आणि सर्व पदाधिकारी तसेच काळे गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad