*चार वर्षांच्या प्रवासात स्वतःला सिद्ध करा-डाॅ. कैलाश करांडे*
पंढरपूर सिंहगड मध्ये हॅकॅथाॅन २के२४ उत्साहात
पंढरपूर: प्रतिनिधी
आयुष्यात निवडलेले करिअर सर्वात चांगले किंवा सर्वात प्रभावी आहे यावर आत्मविश्वास अवलंबून असतो. आत्मविश्वास म्हणजे स्वतःवर "विश्वास ठेवणे". अपयशाची पर्वा न करता स्वतःच्या करिअर मध्ये यशस्वी होण्यावर आवश्कतेपेक्षा जास्त विश्वास असणे म्हणजे अतिआत्मविश्वास आहे तो आत्मविश्वास तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. स्वतःमध्ये बदल घडवायचा असेल तर महाविद्यालयात ज्या अॅक्टिव्हिटी घेण्यात येतात त्यामध्ये सहभाग घेणे गरजेचे आहे. सध्याच्या जगात नोकरी मिळवणे अवघड नाही. पण नवनवीन तंत्रज्ञान अवगत होत असताना इतरांपेक्षा काहीतरी वेगळे करण्याची जिद्द चिकाटी तुमच्या असली पाहिजे. अभियांत्रिकीच्या पुढील चार वर्षांत झोकून द्या, भरपूर स्ट्रगल केल्यास आपण या प्रवासात निश्चित स्वतःला सिद्ध करून शकाल. असे मत प्राचार्य डॉ. कैलाश कराडे यांनी बोलताना व्यक्त केले.
एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मध्ये गुरुवार दिनांक ५ सप्टेंबर २०२४ रोजी हॅकॅथाॅन २ के २४ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन डेलाॅइट यु एस आय चे सल्लागार सुनिल खारे, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, प्रा. नामदेव सावंत, प्रा. सुमित इंगोले, विद्यार्थी प्रतिनिधी गायत्री महाजन आदींच्या हस्ते डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलनाने करण्यात आली. दरम्यान प्रमुख मान्यवरांचा महाविद्यालयाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले तसेच शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी शिक्षक व शिक्षिकांचा गुलाब देऊन सन्मान केला.
या दरम्यान पॅराडिसी सोल्यूशन्स कंपनीचे मोबाईल एप्लिकेशन डेव्हलपर गोपाळ गायकवाड, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डाॅ. समीर कटेकर, सुनिल खारे, प्रा. नामदेव सावंत यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना संबोधित केले. ही स्पर्धा विद्यार्थ्यांच्या कल्पना शक्तीला वाव देण्यासाठी आयोजित करण्यात आलेली हॅकॅथाॅन स्पर्धा सलग दोन दिवस चालणार आहे.या स्पर्धेतून विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीला चालणार मिळणार आहे. या कार्यक्रमाचे सुञसंचलन व आभार प्रदर्शन कुमारी सानिया मुल्ला आणि आदेश कुलकर्णी यांनी केले. हि स्पर्धा यशस्वी करण्यासाठी काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभागातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.