मनसेच्या वतीने वैद्यकीय सेवा बजावणाऱ्या सर्व डॉक्टर्स बंधूंचा मनसे गौरव..

 मनसेच्या वतीने वैद्यकीय सेवा बजावणाऱ्या सर्व डॉक्टर्स बंधूंचा मनसे गौरव..



पंढरपूर /प्रतिनिधी


काळ वेळ न पाहता जे होतात रुग्णसेवेत रुजू सांगा डॉक्टर तुमचे उपकार कोणत्या शब्धात मोजू या वाक्याप्रमाणे 

पंढरपूर शहर व तालुक्यात गेली अनेक वर्ष अविरतपणे वैद्यकीय सेवा बजावून लोकांचे प्राण वाचवून हजारो लोकांना जीवनदान देऊन त्यांचे कुटुंब आनंदी आणि सुखी राहावे यासाठी अविरतपणे काम करणाऱ्या माणसातील देव माणूस असलेल्या पंढरपूर येथील सर्व डॉक्टर्स बंधूंचा गौरव व सन्मान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मनसे नेते दिलीपबापू धोत्रे यांच्या हस्ते पार पडला.

याप्रसंगी व्यासपीठावर श्री. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील, आय.एम.ए अध्यक्ष डॉ. शितल शहा, निमा अध्यक्ष डॉ. अमरसिंह जमदाडे, डेंटल असोसिएशन अध्यक्षा डॉ. सौ.ऋचा खूपसंगीकर, होमिओपॅथी असोसिएशन अध्यक्षा डॉ. सौ.जयश्री शिनगारे, पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. महेश सुडके, तालुका वैद्यकीय अधिकारी एकनाथ बोधले उपस्थित होते.

याप्रसंगी डॉक्टर्स बंधूंशी संवाद साधताना मनसे नेते दिलीपबापू धोत्रे यांनी सुरुवातीला सर्व डॉक्टर्स बंधूंचे आभार मानून आपला परिचय करून देताना शालेय जीवनापासून आतापर्यंतच्या राजकीय प्रवासाला उजाळा देत मनसेच्या वतीने पंढरपूर शहरात केलेल्या सामाजिक कार्याची माहिती दिली. 

यानंतर पंढरपूर येथील सर्व डॉक्टर संघटनेचे अध्यक्ष, पदाधिकारी आणि वैद्यकीय क्षेत्रात काम करत असणाऱ्या सर्व डॉक्टर्स मंडळींचा भगवी शाल, फेटा बांधून पुष्पहार घालून व मनसे गौरवचिन्ह देऊन मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या हस्ते सन्मान करून मनसे गौरव सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. 

 

या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि डॉक्टर संघटनेच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दिनांक 4 सप्टेंबर 2024 रोजी पंढरपूर येथील लिंक रोड वरील हॉटेल चतुर्थी हॉल येथे करण्यात आले होते.


यावेळी मनसे जिल्हा अध्यक्ष प्रशांत गिड्डे, , संतोष कवडे, गणेश पिंपळनेरकर, अनिल बागल, ऍड. संदीप रणनवरे, ऍड. पराग जहागीरदार, उद्योजक सुहास शिर्के, आदित्य फत्तेपूरकर, अनिल सप्ताळ,शशिकांत पाटील यांच्यासह सर्व डॉक्टर्स संघटनांचे पदाधिकारी आणि डॉक्टर्स बंधू उपस्थित होते.




मनसे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांनी मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या कामाची दखल घेऊन राज्यातील मनसेचा पहिला उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर त्यांना जनतेचा तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींचा वाढता पाठिंबा मिळू लागला. 

यामध्ये मोठी भर पडली ती विठ्ठलचे चेअरमन अभिजीत पाटील यांची यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत दिलीप धोत्रे यांची ताकत व अभिजीत पाटील यांची ताकत एकवटुन धोत्रे यांचे पारडे जड झाल्याची चर्चा सर्वत्र रंगू लागली आहे.


#pandharpur #Mangalvedha #vidhansabhaelection2024 #Politics #amdar

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad