*योग हा मनाचा- शरीराचा व्यायाम आहे- डाॅ. शिवाजीराव मस्के*
□ पंढरपूर सिंहगड मध्ये "योग ॲण्ड मेडिटेशन" विषयावर कार्यशाळा
पंढरपूर: प्रतिनिधी
रोजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत मेडिटेशन म्हणजेच ध्यान तुम्हाला आराम करण्यास गरज असते जेव्हा आपली इंद्रिये सुस्त किंवा कंटाळवाणी होतात, तेव्हा ध्यान आपल्याला आपली जागरूकता वाढवण्याची संधी देते. संशोधनामध्ये असे सांगण्यात आले आहे की, ध्यान केल्यामुळे तात्पुरत्या स्वरूपातील तणाव दूर केला जाऊ शकतो. आरामदायी आणि सुखदायी फायद्यांमुळे, अनेक तज्ज्ञ आपल्याला निरोगी आणि सक्रिय जीवनासाठी ध्यान करण्याचा सल्ला देत असतात याशिवाय योग ही एक निरोगी जीवनशैली जगण्याची कला आणि विज्ञान आहे. योग हा मनाचा-शरीराचा व्यायाम आहे. योग हालचाल, ध्यान आणि श्वासोच्छवासाच्या पद्धतींद्वारे मानसिक आणि शारीरिक ताणतणाव कमी होत असतो असे मत डाॅ. शिवाजीराव मस्के यांनी पंढरपूर मध्ये बोलताना व्यक्त केले.
एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील प्रथम वर्ष अभियांत्रिकीमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ प्रसंगी योग ॲण्ड मेडिटेशन" विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये योगाचे महत्त्व, उपयोग मेडिटेशन चे फायदे याविषयावर कार्यशाळा प्रात्यक्षिक करून मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
या कार्यशाळेत डाॅ. शिवाजीराव मस्के यांचे प्रा. अनिल निकम यांचे हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. अभिजित सवासे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डाॅ. दिपक गानमोटे, अमोल नवले सह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.