*पंढरपूर सिंहगडच्या सिव्हिल इंजिनीअरिंग मध्ये "स्पार्क २ के २४ उत्साहात*
पंढरपूर: प्रतिनिधी
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मधील सिव्हिल इंजिनीअरिंग विभागात शुक्रवार दिनांक १३ सप्टेंबर २०२४ रोजी राज्यस्तरीय "स्पार्क २ के २४" या इव्हेंट चे आयोजन करण्यात आले होते अशी माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
"स्पार्क २ के २४" या इव्हेंट चे उद्घाटन सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डाॅ. श्रीगणेश कदम यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. यामध्ये सोलापूर जिल्हा तसेच इतर जिल्ह्यातील २०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतल होता. या इव्हेंट मध्थे क्विज काॅम्पिंटेशन, पोस्टर्स प्रेझेंटेशन, माॅडेल मेकिंग आणि लुडो अशा विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेतील माॅडेल मेकिंग स्पर्धेतील विजेते सुजल कवडे, साहिल घालके आणि प्रसाद डोकर तसेच क्विज स्पर्धेत शुभदा मोरे आणि पेपर प्रेझेंटेशन मध्ये कुमारी तेजस्विनी खांडेकर या विजयी स्पर्धकांना रोख रक्कम व सन्मानपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डाॅ. यशवंत पवार, प्रा. सिद्धेश पवार आदींसह सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या इव्हेंट चे सुञसंचलन कुमारी तेजस्विनी खांडेकर हिने केले तर उपस्थितांचे आभार कुमारी प्राप्ती वेळापुरकर हिने मानले.