सोलापूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचा इंडक्शन प्रोग्रम संपन्न
सोलापूर: केगांव येथील एन.बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचा इंडक्शन प्रोग्रमचे उद्घाटन, कॅम्पस डायरेक्टर श्री संजय नवले सर यांच्या मार्गदर्शनाखाली, महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व सोलापूर मधील पहिल्या आंतराष्ट्रीय आयटी कंपनीचे संस्थापक श्री सुमित कुडाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी तथा महिला व बालकल्याण अधिकारी श्री जगदीश दळवी तसेच उत्कृष्ट मल्टिचीप डिझाईन इंजिनिअर नजमा निलेगम जहागीरदार यांच्या विशेष उपस्थितीत सिंहगड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शंकर नवले, ज्येष्ठ संशोधक व माजी कुलगुरू डॉ. एस.एच.पवार, उपप्राचार्य डॉ. रवींद्र व्यवहारे, डॉ.विनोद खरात, डॉ. इम्रान चंदरकी यांच्या हस्ते संपन्न झाले.
सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे रजिस्ट्रार व प्रशासकीय व अप्रशासकीय सेवेतील व्यक्तींची ओळख करून दिली.
आपल्या कॉलेजचे माजी विद्यार्थी शैलेश साठे दोन वेळा गेट परीक्षेत उत्तीर्ण असलेले जिल्हा परिषद पुणे येथे कार्यरत आहेत, त्यांनी विद्यार्थ्यांना सिव्हिल इंजिनियरिंग करून प्रशासकीय सेवेमध्ये येण्यासाठी बहुमोल मार्गदर्शन केले व माजी विद्यार्थीनी श्रृतिका महिंद्रकर ( स्टेट लेव्हल गोल्ड मेडलिस्ट इन डान्स) यांनी अभ्यासासोबतच इतर कार्यक्रमांमध्ये सहभाग घेण्यासाठी उत्स्फुर्त केले. विद्यार्थ्यांनी कलागुण जोपासत वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवावा, असे त्यांनी सांगितले.
अपूर्वा मल्लेश्वर एडके यांनी विद्यार्थ्यांना टेक्निकल स्किल बद्दल माहिती दिली.
याप्रसंगी सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रा . श्रीकांत जगताप सर यांनी इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन कौन्सिल बद्दल माहिती सांगितली तसेच प्रोजेक्ट बेस लर्निंग मधून विद्यार्थ्यांनी कोणते गुण आत्मसात करावे याबद्दल माहिती दिली. जॉब घेणारे नाही तर जॉब देणारे बना, असे त्यांनी सांगितले. त्यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांना उद्योजक होण्यास प्रवृत्त केले.
तसेच एस सॉफ्ट स्कील सोल्युशनचे फाउंडर डायरेक्टर आणि चीफ ट्रेनर डॉ. मोहन देशपांडे 'स्मार्ट इंजिनियरिंग : स्किल्स अॅण्ड इसेन्शियल्स' वरती माहिती दिली. समाजातील समस्या सोडविण्यासाठी इंजिनिअरची भूमिका काय असावी व विद्यार्थ्यांनी त्यांना कशा प्रकारे सामोरे जावे, त्यासाठी त्यांनी फिजिकल आणि मेंटली फिट कसे राहावे हे स्पष्ट केले. त्यासाठी विद्यार्थ्यांनी आऊट ऑफ द बॉक्स विचार करण्याचा बहुमोल सल्ला दिला.
विद्यार्थ्यांमध्ये टेक्निकल, अपटीटुड, क्रिटिकल थिंकिंग, डाटा इंट्रेप्रेटेशन स्कील, अनालिटिकल स्कील असावेत, मल्टीनेशनल कंपनीमध्ये प्लेसमेंट होण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये कसा अपटीटुड असावा, या बद्दल मार्गदर्शन केले.
यानंतर स्टूडेंट ॲक्टिव्हिटी कौन्सिलमध्ये गेस द साँग, गेस द कॅरॅक्टर, हूक टॉप इ. ॲक्टिव्हिटी घेण्यात आल्या
डॉ. विनोद खरात यांनी प्रथम वर्ष मध्ये अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षकांची ओळख करून दिली.
डॉ. राजशेखर येलीकर सर यांनी इंजिनिअरिंग क्षेत्रात असलेली आव्हाने तसेच त्यातून निर्माण होणाऱ्या संधी यांवर बहुमोल मार्गदर्शन केले. यशस्वी इंजिनियर होण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये कोणते गुण व कौशल्य असणे गरजेचे आहे तसेच विद्यार्थ्यांनी प्रॉब्लेम सॉल्विंग कौशल्य विकसित करावी तसेच बिझनेस कम्युनिकेशन वरती भर द्यावा हे त्यांनी सांगितले.
अमृत ढगे यांनी विद्यार्थ्यांना त्यांचे विचार योग्य रीतीने अभिव्यक्त करण्यास प्रवृत्त केले तसेच विद्यार्थ्यांनी नैतिकदृष्ट्या सक्षम असले पाहिजे आणि येणारे अपयशांना सामोरे गेले पाहिजे असे त्यांनी सांगितले.
सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी मिस्टर अँड मिस फ्रेशर कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
मिस्टर फ्रेशर - सुधर्म कुलकर्णी
मिस फ्रेशर - धनश्री चव्हाण
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.आयेशा अलीम व श्रीयांका पाटील यांनी केले तसेच कार्यक्रमाचे को ऑर्डीनेटर म्हणून प्रा.आयेशा अलीम आणि प्रा.एन. डी. खराडे यांनी काम केले व आभारप्रदर्शन डॉ. विनोद खरात यांनी मानले. या कार्यक्रमासाठी डॉ. इम्रान चंदरकी, प्रा.एन. डी. खराडे, डॉ. सुवर्णा क्षीरसागर, प्रा.सविता कोंडा, प्रा.किरण पाटील,डॉ. अमित कांबळे, प्रा. नितीश पोतदार, प्रा. सचिन घाडगे, डॉ.प्रवीण भालेराव, प्रवीण शिंदे, विवेक ब्रह्मशेट्टी यांनी परिश्रम घेतले.