*पंढरपूर सिंहगड मध्ये "डेव्हलपिंग क्रिटिकल थिंकिंग स्किल विथ पायथाॅन" या विषयावर कार्यशाळा संपन्न*
पंढरपूर: प्रतिनिधी
एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पंढरपूर येथील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग व इनोवेशन क्लब (आई.सी) यांच्या संयुक्त विद्यमाने व कॉलेजचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर सिंहगड मध्ये डेव्हलपिंग क्रिटिकल थिंकिंग स्किल विथ पायथाॅन या विषयावर दिनांक ११ सप्टेंबर २०२४ रोजी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. ही कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाली असल्याची माहिती इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागाचे विभाग प्रमुख डॉ. अल्ताफ मुलाणी यांनी दिली.
या कार्यशाळेमध्ये प्रा. विनय जोकरे यांनी विचार कौशल्ये वाढविण्यासाठी पायथाॅन चा वापर कसा केला जाऊ शकतो, वेगवेगळ्या एप्लीकेशन मध्ये पायथाॅन चा उपयोग कसा करतात? हे त्यांनी कोड च्या माध्यमातून मुलांना समजावून सांगितले. पायथाॅन ची व्यावहारिक उदाहरणे आणि वास्तविक-जगातील अनुप्रयोगांनी तांत्रिक क्षेत्रातील विश्लेषणात्मक विचारांना चालना देण्यासाठी त्याची भूमिका,याविषयी मार्गदर्शन केले .
याबद्दल माहिती देताना प्राचार्य डॉ. कैलाश करांडे म्हणाले की ,विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाव्यतिरिक्त परंतु विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व नोकरीत संधी मिळण्याच्या प्रक्रियेतील एका महत्त्वाचा भाग म्हणून असे कार्यक्रम नेहमीच आयोजित केले जातात.
या प्रोग्रॅम अंतर्गत तृतीय वर्गात शिकणाऱ्या ३५ विद्यार्थ्यानी प्रत्यक्ष सहभाग नोंदविला. हा प्रोग्रॅम पार पाडण्यासाठी विभाग प्रमुख डॉ. अल्ताफ मुलाणी, प्रा. सोनाली गोडसे, व विदयार्थी प्रतिनिधी म्हणून प्रथमेश आराध्ये यांनी जबाबदारी पार पाडली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग विभागातील सर्व शिक्षक व शिक्षेकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.