*पंढरपूर सिंहगड मध्ये "इंजिनिअर्स डे" उत्साहात साजरा*
पंढरपूर: प्रतिनिधी
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मध्ये शनिवार दिनांक १४ सप्टेंबर रोजी १५ सप्टेंबर चा इंजिनिअर्स डे हा सर मोक्षगुण्डम विश्वेश्वरय्या जन्मदिनाचे औचित्य साधून साजरा करण्यात आला असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मध्ये आयोजित करण्यात आलेल्या इंजिनिअर्स डे निमित्त प्रमुख पाहुणे लेखक, प्रकाशक आणि संपादक अमोल कदम हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस अमोल कदम, प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, डाॅ. अल्ताफ मुलाणी, प्रा. अनिल निकम, माजी विद्यार्थी मनोज जाधव आदीच्या हस्ते सर मोक्षगुण्डम विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले.
दरम्यान प्रमुख पाहुणे अमोल कदम यांचे महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या हस्ते शाल, विठ्ठल मुर्ती व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी केले. दरम्यान प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना संबोधित केले.
या कार्यक्रमात महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्म्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला तो इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ. अल्ताफ मुलाणी यांनी स्विकारला.
या दरम्यान प्रमुख पाहुणे अमोल कदम यांनी आपल्या आयुष्यातील उद्योग क्षेञातील अनेक उदाहरण विद्यार्थ्यांना देऊन संबोधित केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील
प्रा. अनिल निकम, प्रा. अभिजित सवासे आदींसह प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभागातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सुञसंचलन कुमारी वरदा बिडकर आणि सानिका बाबर यांनी केले तर उपस्थितांचे आभार डाॅ. दिपक गानमोटे यांनी मानले.