*व्हर्च्युअल कॅम्पस द्वारे रोजगाराच्या अनेक संधी-डाॅ. सागर वाघमारे*
□ *पंढरपूर सिंहगडच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभाग व्हर्च्युअल कॅम्पस ड्राईव्ह संपन्न*
पंढरपूर: प्रतिनिधी
अलिकडच्या काळात नवनवीन तंत्रज्ञान अवगत होत आहे. या अवगत होणार तंत्रज्ञानासाठी कंपन्यांना लागणारे मनुष्यबळ विकसित करण्यासाठी पंढरपूर सिंहगड महाविद्यालयाचा मोलाचा वाटा आहे. पंढरपूर सिंहगड कॉलेजने व्हर्च्युअल कॅम्पसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख शिक्षण देण्याचे काम सुरू केले आहे हे कौतुकास्पद आहे. महाविद्यालयातील शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना कॅम्पस प्लेसमेंट ची क्रेझ असते. यामुळे अनेक विद्यार्थी नामांकित कंपनीत प्लेस होत असतात. माञ व्हर्च्युअल कॅम्पस हे अनेक माजी विद्यार्थ्यांसाठी उपयोगी ठरत आहे. यातुनच कंपन्यांना आवश्यक असलेले मनुष्यबळ विकसित करून व्हर्च्युअल कॅम्पस च्या माध्यमातून अनेक रोजगाच्या नवनवीन संधी उपलब्ध होतील असे मत डाॅ. सागर वाघमारे यांनी पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज मधील कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.
एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मधील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागात शनिवार दिनांक १४ सप्टेंबर २०२४ रोजी व्हर्च्युअल कॅम्पस ड्राईव्ह आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक डाॅ. सागर वाघमारे उपस्थित होते. काॅलेजच्या वतीने डाॅ. सागर वाघमारे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. समीर कटेकर, प्रा. अभिजित सवासे, प्रा. अविनाश हराळे सह विद्यार्थी अकाश कट्टे आदींसह इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.