*पंढरपूर सिंहगडच्या विद्यार्थ्यांची विद्युत वितरण कंपनीस भेट*
पंढरपूर: प्रतिनिधी
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस के एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनियरिंग महाविद्यालयातील इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची ४०० के व्ही व २२० के व्ही महावितरण लांबोटी सबस्टेशनला गुरुवार दिनांक १२ सप्टेंबर २०२४ रोजी भेट देऊन माहिती जाणून घेतली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
या भेटीमध्ये सिंहगड महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सबस्टेशनचे काम, वेगवेगळ्या विद्युत उपकरणांचा प्रोटेक्शनसाठी वापर, विद्युत सेवा वेगवेगळ्या क्षेत्रात कशी विभागणी करून पोहचवली जाते व बॅटरी स्टोरेज सिस्टीम माहिती तसेच विविध इन्स्टॉलेशन विषयी अत्यंत महत्त्वाची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लांबोटी येथील सबस्टेशन चे अतिरिक्त कार्यकारी अभियंता मनोज ठाकरे यांनी सबस्टेशनचे कार्य आणि नियंत्रण तपशीलवार वर्णन केले. याशिवाय सहाय्यक अभियंता इरफान मुजावर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना महत्व पूर्ण माहिती दिली.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयातील विद्युत विभाग प्रमुख प्रा. व्ही. पी. मोरे ,आय व्ही समन्वयक प्रा.अमोल गोडसे, प्रा. डी.एम.कोरके आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.