पंढरपूर शहरात गणेश मंडळांना पुजेच्या साहित्याचे वाटप मा.प्रणव परिचारक
प्रतिनिधी पंढरपूर-
सार्वजनिक गणेश मंडळाच्या माध्यमातून होत असलेल्या सेवा कार्यास परिचारक कुटूंबीयांकडून मनपुर्वक शुभेच्छा या प्रसंगी प्रणव परिचारक यांनी व्यक्त केल्या.
गणेशोत्सव हा सुखाची चाहूल घेऊन येणारा सण असतो. विघ्न दुर करून आनंदाची उर्जा देणारा अधिपती म्हणून गणपती बप्पाकडे पाहिले जाते. स्व.कर्मयोगी सुधाकर आजोबांनी व मा.आ.प्रशांत काकांनी गेली पाच दशके गणेशोत्सव मंडळातील अनेक कार्यक्रमात उपस्थित राहून गणेशोत्सव अधिक आनंदाने वृध्दिंगत करण्यासाठी गणेशभक्तां सोबत सलोख्याचे संबंध ठेवून कार्य केले आहे.
त्यांच्याच मार्गदर्शनाखाली पंढरपूर अर्बन बँक व मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून गेल्या चाळीस वर्षापासून अधिका काळ गणेश मंडळांना बक्षीसांचे वितरण होत असल्याचे मा.प्रणव परिचारक यांनी सांगितले. हाच वसा पुढे घेत आपल्या मंडळातील गणरायाची पुजा व्हावी या मनोकामनाने पुजा साहित्य सामग्रीचे किट व शुभेच्छा पत्राचे वाटप शहरातील गणेश मंडळांना देण्यात आले.
पुढे बोलताना परिचारक म्हणाले की, सार्वजनिक मंडळ म्हणजे कार्यकर्ते घडण्याची कार्यशाळा म्हटली जाते. मी पण लहानपणापासून गणशोत्सवात काम करत आलो आहे. त्यामुळे गणपती चरणी असणारी भक्ती, मंडळातील कार्यकर्त्यांमध्ये असलेली एकजूट, कधी कधी होणारे रूसवे फुगवे मनाला कायम भावत आले. मंडळात अनेक वेळा मतभेद होतात मात्र गणेशाची सेवा करण्यासाठी गट तट बाजूला करत सारेजण एकत्र येतात. आणि हिच एकजूट मंडळाला आणि संघटनेला मजबूत करते. अशाच एकदिलाने असलेल्या आपल्यासारख्या मंडळाचा मला अभिमान वाटतो व म्हणूनच तुमचा मित्र, भाऊ, वडीलधारी मंडळींचा मुलगा या नात्याने मी सदैव तुमच्या सुख दुखात सोबत असेन.