हँडबॉल टूर्नामेंट ची धुरा सिंहगडच्या वाघिणींच्या हाती*

 *हँडबॉल टूर्नामेंट ची धुरा सिंहगडच्या वाघिणींच्या हाती* 



सोलापूर प्रतिनिधी 

सीबीएसई साउथ झोन दोनच्या हँडबॉल टूर्नामेंट च्या स्पर्धेचे आयोजन दि. 21 सप्टेंबर ते दि. 24 सप्टेंबर या कालावधीत केलेले असून त्याचे उद्घाटन दि. 20 सप्टेंबर 2024 रोजी सोलापूर केगाव येथील सिंहगड इन्स्टिट्यूट च्या भव्य आणि प्रशस्त प्रांगणात झाले. " *एक पाऊल स्त्री सन्मानाकडे* " या संकल्पनेचा वापर करून यंदाच्या स्पर्धा पार पाडणार आहेत. स्त्री सन्मानाचा विषय प्रत्येक खेळाडूच्या मनात रुजावा, नागरिकांच्या मनात रुजावा, असा या संकल्पनेचा हेतू असल्याने संपूर्ण स्पर्धेची धुरा सिंहगड पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेजच्या वाघिणीने उचलल्याची माहिती संस्थेचे कॅम्पस डायरेक्टर, महाराष्ट्र हँडबॉल असोसिएशनचे अध्यक्ष व सोलापूर जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष मा. श्री. संजय नवले यांनी उद्घाटन प्रसंगी दिली. हँडबॉल च्या एका टीम मध्ये एकूण 16 स्पर्धक चा समावेश असतो त्याच धर्तीवर या हँडबॉल स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी सिंहगडच्या 16 वाघिणींनी जबाबदारी घेतलेली आहे व त्या अतिशय उत्तमरीत्या पार पाडत असल्याचे दिसून येत आहे. स्पर्धेचे अत्यंत सूक्ष्म आणि तपशीलवार नियोजनाने पर राज्यातून आलेल्या स्पर्धक संघांनी संस्थेचे आणि नियोजन करणाऱ्या शिक्षकांचे मनापासून कौतुक व अभिनंदन केले. स्पर्धक संघ सोलापुरात पोहोचून त्यांना संस्थेच्या आवारात आणण्यापासून ते त्यांच्या स्पर्धा पार पडून त्यांना रेल्वे स्टेशन अथवा एस टी स्टँड पर्यंत पोहोचवण्यापर्यंत ची सोय संस्थेने स्वतःच्या बसने केली असून, ती सर्व जबाबदारी या वाघिणीच पार पाडत आहेत. काही संघ रात्री अपरात्री आले तरी त्यांची नोंदणी, त्यांना राहण्यासाठी खोलीची व्यवस्था, नाष्टा, जेवण, चहा या सर्व बाबी अत्यंत बारकाईने पार पाडल्या जात आहेत.

सदर स्पर्धेमध्ये एकूण तीन विभागातील संघ सहभागी झाले आहेत (U-14, U-17, U-19). महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरला येथून मुला मुलींचे 107 संघ आणि जवळपास 1460 स्पर्धक सहभागी झाले आहेत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या आगमनानंतर सीबीएसई ध्वजाचे ध्वजारोहण कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त मा. एम. राजकुमार यांच्या हस्ते झाले. यानंतर सर्व संघांचे संचालन करण्यात आले. क्रीडाजोत प्रज्वलित करून सिंहगडच्या विद्यार्थिनींनी त्याचे प्रांगणात प्रदर्शन केले. यानंतर सर्व संघांनी व स्पर्धकांनी क्रीडाशपथ घेतली. कार्यक्रमाची खरी रंगत महाराष्ट्राच्या ठसकेबाज लावणीजोगवा या नृत्याने आणली. उद्घाटनाच्या सोपस्करानंतर महाराष्ट्राच्या लावणी व जोगवा या नृत्याने सर्वांनाच मंत्रमुग्ध करून अचंबित केले. यासोबतच आपली संस्कृती आणि परंपरेचे प्रतीक 'विठुरायाची वारी' या नृत्याने सर्वांना भारावून टाकले. या तीनही नृत्य प्रकारानंतर फ्युजन डान्सने सुद्धा स्पर्धकांना एक अनोखी अनुभूती दिली. यापूर्वी अशा पद्धतीने एखाद्या सीबीएसई कार्यक्रमाची उद्घाटन सोहळ्याची सुरुवात झाली नसल्याचे उपस्थित मान्यवरांनी सांगितले. सोलापुरातील हा उद्घाटन सोहळा सर्व संघांना अचंबित करणारा ठरला. सिंहगड नेहमीच काही वेगळे देण्याचा प्रयत्न करीत असल्याची प्रचिती आल्याचा अनुभव उपस्थितानी व्यक्त केला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त मा. एम. राजकुमार यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन झाल्याचे जाहीर केले. पोलीस आयुक्त मा. एम. राजकुमार यांनी आपल्या अध्यक्ष भाषणात त्यांच्या शालेय व कॉलेज जीवनातील त्यांनी स्पर्धा प्रकारामध्ये घेतलेल्या सहभागाची आठवण करून देऊन सर्व स्पर्धकांना खेळ पाहुणेने खेळा असा संदेश दिला. कार्यक्रमाचे उद्घाटन अतिशय सुंदर रित्या पार पडल्याचे त्यांनी विशेष नमूद केले. तसेच आयोजकांचे त्यांनी मनपूर्वक धन्यवाद ही व्यक्त केला. उद्घाटन सोहळ्याप्रसंगी सिंहगड संस्थेचे कॅम्पस डायरेक्टर मा. श्री संजय नवले सर, सीबीएसई निरीक्षक प्रुणा श्रेष्ठा, एन.बी. नवले, इंजीनियरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. शंकर नवले, फौजदार चावडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. श्री. अरविंद माने, तसेच सिंहगड पब्लिक स्कूल कमलापुर सांगोला च्या प्राचार्या चैताली मराठे यांची प्रमुख उपस्थिती होती. हा उद्घाटन सोहळा यशस्वी करण्यासाठी सिंहगड पब्लिक स्कूल आणि जूनियर कॉलेजचे प्राचार्य निखत शेख व उपप्राचार्य प्रकाश नवले आणि सर्व शिक्षक वृंद, कर्मचारी यांनी श्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad