संगीत ऐकल्याने मानसिक तणावातुन मुक्ती मिळते- डाॅ. प्रसाद कुलकर्णी* □ पंढरपूर सिंहगड मध्ये म्युझिक क्लबचे शानदार उद्घाटन

 *संगीत ऐकल्याने मानसिक तणावातुन मुक्ती मिळते- डाॅ. प्रसाद कुलकर्णी*


□ पंढरपूर सिंहगड मध्ये म्युझिक क्लबचे शानदार उद्घाटन 




पंढरपूर: प्रतिनिधी 



मानसिक आरोग्यासाठी संगीताचा सर्वात आकर्षक फायदा आहे. माणसाचा ताण-तणाव कमी करण्यासाठी संगीत हे प्रभावी माध्यम आहे. संगीत हे बुद्धिमत्ता आणि लक्ष केंद्रित करते, मानसिक आरोग्य सुधारते आणि रोगप्रतिकारक शक्ती तसेच आत्मसन्मान आणि आत्मविश्वास वाढवते. संगीताचा उपयोग आराम करण्यासाठी, आपला मूड वाढवण्यासाठी आणि एकाग्रता सुधारण्यासाठी केला जाऊ शकतो. निद्रानाशात मदत करण्यासाठी, गाढ झोपेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि प्रेरित करण्यासाठी संगीताचा वापर केला जाऊ शकतो. संगीत ऐकल्याने मानसिक तणावातुन मुक्ती मिळते असे मत डाॅ. प्रसाद कुलकर्णी यांनी पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज मधील म्युझिक क्लब च्या उद्घाटन प्रसंगी बोलताना व्यक्त केले.

   एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग कोर्टी (ता.पंढरपूर) मध्ये सोमवार दिनांक २३ सप्टेंबर २०२४ रोजी प्रमुख पाहुणे डाॅ. प्रसाद कुलकर्णी यांच्या हस्ते म्युझिक क्लबचे उद्घाटन करण्यात आले. विद्यार्थ्यांना संगती क्षेञाची आवड निर्माण होऊन मानसिक तणावातून मुक्त विद्यार्थी रहावे यासाठी महाविद्यालयात म्युझिक क्लब ची संकल्पना विचाराधीन होती. ती संकल्पना आज प्रत्यक्षात उतरली असुन जे विद्यार्थी संगीतप्रेमी आहेत. त्यांच्या केलेला वाव मिळेल असे मत प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे यांनी व्यक्त केले.

   या कार्यक्रमात डाॅ. प्रसाद कुलकर्णी यांचे महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे व मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डाॅ. श्याम कुलकर्णी यांचे हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यादरम्यान महाविद्यालयातील हार्मोनियम वादक नवनाथ माळी व तबला वादक संकेत खडतरे यांनी मान्यवरांचे स्वागत गीताने स्वागत केले.

    या कार्यक्रमासाठी उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, प्रा. प्रसाद कुलकर्णी, प्रा. ऋषिकेश देशपांडे आदींसह महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षेकेतर कर्मचारीवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad