*पंढरपूर सिंहगडच्या १० विद्यार्थ्यांची टीसीएस कंपनीत कॅम्पस मुलाखतीतून निवड*
○ वार्षिक ७ लाख पॅकेज मिळविणारे ५ विद्यार्थी: तर ५ विद्यार्थ्यांना ३.३६ लाख वार्षिक पॅकेज
पंढरपूर: प्रतिनिधी
देशातील विविध नामांकित कंपनीत पंढरपूर सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेज मधील विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड होत असुन सिंहगड संस्थेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी माहिती तंत्रज्ञान सेवा, व्यापाराभिमुख प्रणाली सेवा आणि आउंटसोर्सिंग सेवा पुरवठा या क्षेत्रात काम करण्याची संधी प्राप्त होत असून चालू शैक्षणिक वर्षांत कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील १० विद्यार्थ्यांची टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टी.सी.एस.) या कंपनीत कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड झाली असल्याची माहिती ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर यांनी दिली.
"टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस" या उद्योग समूहातील सर्वाधिक बाजार मुल्यांकन असलेली व्यापारी संस्था आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षात ११६,३०८ कर्मचारी, ४७ देशातील कार्यालये आणि ५.७ अब्ज अमेरिकी डॉलर वार्षिक उत्पन्न असलेली "टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस" (टी.सी.एस.) कंपनी आहे. भारतातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वात मोठी व्यापारी संस्था म्हणून "टीसीएस" या कंपनीचा उल्लेख केला जातो.
"टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस" या कंपनीत पंढरपूर सिंहगड काॅलेज मध्ये अंतीम वर्षात अभियांत्रिकीची पदवी प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या "टीसीएस" कंपनीकडून मुलाखती घेण्यात आल्या होत्या. या मुलाखतीतून विद्यार्थ्यांना कंपनीत आवश्यक असलेली शैक्षणिक गुणवत्ता, उपयुक्त ज्ञान, शिस्त या सर्व गोष्टींवर "टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस" या कंपनीत मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील संदीप अशोक क्षीरसागर, काॅम्प्युटर सायन्स अॅण्ड इंजिनिअरिंग विभागातील गायञी श्रावण पुरी, पृथ्वीराज संतोष माळी, शिवानी मनोहर शिंदे आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातील धनश्री आनंद टोणे या पाच विद्यार्थ्यांना वार्षिक ७ लाख पॅकेज (डिजिटल) तर काॅम्प्युटर सायन्स अॅण्ड इंजिनिअरिंग विभागातील तेजस जयसिंग मस्के, केदार दत्तात्रय कौलवार, आकांक्षा मनोज मिरगाणे आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागातील शुभम शंकर साळुंखे, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातील पल्लवी हनुमंत लोखंडे आदी ५ विद्यार्थ्यांना वार्षिक ३.३६ लाख पॅकेज (निंजा) मिळाले असुन एकूण १० विद्यार्थ्यांची कॅम्पस मुलाखतीतून टीसीएस कंपनीत निवड झाली आहे.
एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालय हे विद्यार्थी व पालकांच्या विश्वास पाञ ठरले आहे. महाविद्यालयाचे प्लेसमेंट व निकाल हे प्रत्येक वर्षे उत्कृष्ट लागत आहे.
"टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस" या कंपनीत निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे पालक, संस्थेतील सर्व पदाधिकारी यांच्यासह कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.