*पंढरपूर सिंहगड मध्ये "हाई परफॉर्मन्स कम्प्युटिंग" या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न*
पंढरपूर: प्रतिनिधी
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग मधील काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभागात शनिवार 31 ऑगस्ट २०२४ रोजी ""हाई परफॉर्मन्स कम्प्युटिंग"या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. हि कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
महाविद्यालयातील काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभागातील विद्यार्थ्यांसाठी प्रा. हर्श नामदेव भोर यांचे "हाई परफॉर्मन्स कम्प्युटिंग"याविषयावर मार्गदर्शन लाभले.
या कार्यशाळेत प्रा. हर्श नामदेव भोर यांनी हाय परफॉर्मन्स कम्प्युटिंग, काॅम्प्युटींग आर्किटेक्चर, सर्विस माॅडेल आदीं विषयी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले तसेच विविध माध्यमातून प्रात्यक्षिक दाखवून विद्यार्थ्यांकडून प्रात्यक्षिक करून घेतले. हि कार्यशाळा काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभागातील द्वितीय व तृतीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत महाविद्यालयातील १०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
हि कार्यशाळा विद्यार्थ्यांना भविष्यातील करिअरसाठी उपयुक्त ठरणार आहे. या कार्यशाळेचे सुञसंचलन व आभार प्रदर्शन प्रा. मनोज कोळी यांनी केले. ही कार्यशाळा काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभाग प्रमुख प्रा.सुभाष पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती. ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभागातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.