स्वेरीच्या पाच विद्यार्थ्यांची ‘अॅक्वा चिल सिस्टम्स प्रा.लि.’ या नामांकित कंपनीत निवड
पंढरपूरः ‘अॅक्वा चिल सिस्टम्स प्रायव्हेट लिमिटेड’ या नामांकित कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग व इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या विभागांतील पाच विद्यार्थ्यांची कॅम्पस ड्राईव्ह मधून निवड करण्यात आली आहे.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली.
‘अॅक्वा चिल सिस्टम्स प्रायव्हेट लिमिटेड’ या नामांकित कंपनीच्या निवड समितीने निवड प्रक्रियेच्या अंतिम फेरीतून स्वेरीच्या जगदीश भीमाशंकर हनमावाले, विराज वसंत शेटे, नागेश भास्कर गाजरे, प्रथमेश नागेश साळुंखे व विशाल पंपू ढगे या पाच विद्यार्थ्यांची निवड केली ‘अॅक्वा चिल सिस्टम्स प्रायव्हेट लिमिटेड’ ही कंपनी २७ वर्षे जुनी असून १९९७ साली स्थापन झाली आहे. ही कंपनी प्रामुख्याने एचव्हीएसी या क्षेत्रात कार्यरत आहे. लवकरच ही कंपनी एक हजार कोटी टर्न ओव्हरचे ध्येय गाठणार आहे. एचव्हीएसी हे एक विशेष कार्यक्षेत्र आहे, त्याचा उपयोग फार्मसी, दवाखाने, मेकॅनिकल आणि इतर बऱ्याच विभागात होतो. यामुळे विद्यार्थ्यांना अशा विविध क्षेत्रात काम करण्याची संधी मिळणार आहे. स्वेरी अभियांत्रिकीमध्ये विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्या प्लेसमेंटसाठी येत असतात आणि कंपनीसाठी पात्र अशा विद्यार्थ्यांची निवड करत असतात. त्यामुळे विविध आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये येथील विद्यार्थी आपले उत्तम करिअर घडवीत आहेत. या विद्यार्थ्यांना स्वेरीमध्ये विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. सदर विद्यार्थ्यांना ट्रेनिंग अँड प्लेसमेंट मधील व विभागातील प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे, उपाध्यक्ष हनीफ शेख तसेच संस्थेचे विश्वस्त व पदाधिकारी, स्वेरी कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम.एम. पवार, अभियांत्रिकी पदवीच्या उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांच्यासह पालकांनी कॅम्पस इंटरव्युवमधून ‘अॅक्वा चिल सिस्टम्स प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीत निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्याचे अभिनंदन केले.