*आखाड्यात आपण मैदान मारण्यासाठी उतरलो आहे* - अभिजीत पाटील.
(श्री विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त टेंभुर्णी येथे निकाली कुस्ती मैदान संपन्न)
(अभिजीत पाटील यांनी माढा मतदारसंघांत जनसंपर्क वाढवण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू)
प्रतिनिधी/-
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त टेंभुर्णी येथे 'माढा केसरी २०२४' निकाली कुस्ती मैदानाचे दिनांक १८ऑगस्ट रोजी टेंभुर्णी येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माढा तालुक्यातील सर्व राजकीय पक्षातील नेतेगण तसेच कुस्तीमल्ल, वस्ताद व कुस्तीप्रेमींनी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी केली होती.
यावेळी अभिजीत पाटील बोलताना म्हणाले की; विधानसभेच्या आखाड्यात आपण मैदान मारण्यासाठी उतरत आहोत असे स्पष्ट सांगून विरोधकांना टोला लागलेला आहे.कधीकधी जोड नसल्यास अडवून कुस्ती मारावी लागते, कुस्ती हा बुद्धी, चातुर्य, चपळतेचा, साहस्येचा खेळ आहे. आपणा सर्वांचे प्रेम, आशीर्वाद असेच मिळत राहो ज्याला जे लक्षात यायला लागले ते घ्यावं आपण या ठिकाणी कुस्ती मैदान मारायलाच आलो आहे असे अभिजीत पाटील यांनी म्हणत माढ्यातून विधानसभा लढवणार असल्याचे संकेत दिले असल्याची कुजबूज माढा मतदारसंघांमध्ये आज दिवसभर पाहायला मिळाली.
यावेळी मोठ्या कुस्तीमध्ये पैलवान महेंद्र गायकवाड विरुद्ध पैलवान आशिष उड्डा यांची निकाली कुस्तीमध्ये पैलवान आशिष उड्डा यांनी आपली बाजी मारून मानाची गदा मिळवली.
याच अनुषंगाने अभिजीत पाटील यांनी माढा मतदारसंघातून गाठीभेटी वर जोर दिला असून माढा तालुक्यात कुस्तीचे मैदान भरवले तर माढा तालुक्यात विविध गावांमध्ये खेळ पैठणीचे कार्यक्रमाचे आयोजन करत आहेत.