पंढरपूर सिंहगडची मानसी नवले पदव्युत्तर (एम.एस.) शिक्षणासाठी अमेरिकाला रवाना*

 पंढरपूर सिंहगडची मानसी नवले पदव्युत्तर (एम.एस.) शिक्षणासाठी अमेरिकाला रवाना



पंढरपूर: प्रतिनिधी 



कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस.के.एन. सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील काॅम्प्युटर सायन्स अ‍ॅण्ड इंजिनिअरिंग विभागात शिक्षण पुर्ण केलेली कुमारी मानसी सोमनाथ नवले ह्या नुकत्याच अभियांत्रिकीचे पदव्युत्तर (एम एस) शिक्षण घेणेसाठी ११ ऑगस्ट २०२४ रोजी अमेरिकेला ला रवाना झाली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.

एखतपुर (ता. सांगोला) येथील रहिवासी असलेली कुमारी मानसी सोमनाथ नवले हिने एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या काॅम्प्युटर सायन्स अ‍ॅण्ड इंजिनिअरिंग विभागात पदवीचे शिक्षण पुर्ण केले होते. दरम्यान महाविद्यालयातील कॅम्पस प्लेसमेंट मधुन तिची काॅग्निझंट आणि टी.सी.एस या दोन कंपनी निवड झाली होती. दरम्यान एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर महाविद्यालयात असिस्टंट प्रोफेसर या पदावर एक वर्षे नोकरी केल्यानंतर ती आता अमेरिका येथील यु एम बी सी विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षणासाठी जात आहेत. अमेरिकेतील बाल्टी मोअर हे सर्वात प्रतिष्ठित संस्थापैकी एक असुन या युनिव्हर्सिटीत पंढरपूर सिंहगड मध्ये शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर (एम एस) शिक्षणासाठी संधी मिळत असल्याने पालक वर्गातून अभिनंदन व कौतुक होत आहे.

    कुमारी मानसी नवले हिच्या अमेरिकेतील पदव्युत्तर शिक्षणासाठी महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, डाॅ. समीर कटेकर, डाॅ. चेतन पिसे, डाॅ. शाम कुलकर्णी, डाॅ. बाळासाहेब गंधारे, डाॅ. अतुल आराध्ये, डाॅ. श्रीगणेश कदम, डाॅ. सुभाष पिंगळे, डाॅ. सोमनाथ कोळी, डाॅ. दिपक गानमोटे, डाॅ. संपत देशमुख, डाॅ. यशवंत पवार, प्रा. विनोदकुमार मोरे, प्रा. अनिल निकम आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.