*पंढरपूर सिंहगड मध्ये "ऑटोमेशन क्षेत्रातील नोकरी संधी" या विषयावर चर्चासत्र संपन्न*
पंढरपूर: प्रतिनिधी
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग मधील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्म्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागात अंतिम वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी "ऑटोमेशन क्षेत्रामधील नोकरी संधी" आणि त्यासाठी मार्गदर्शन या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले. हे चर्चासत्र मोठ्या उत्साहात संपन्न झाले असल्याची माहिती इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्म्युनिकेशन इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डाॅ. अल्ताफ मुलाणी यांनी दिली.प्राचार्य डॉ. के. जे. करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.
या चर्चासत्र मध्ये माजी विद्यार्थी उमेश देठे, राशेश्वरी मेनकुदळे, आणि प्रशांत पवार यांनी विद्यार्थ्यांना ऑटोमेशन क्षेत्राचे कामकाज, इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरीचे तंत्रज्ञान, तसेच कार्यप्रणाली याबाबत सखोल माहिती दिली. चर्चासत्र दरम्यान विद्यार्थ्यांना ऑटोमेशन क्षेत्रामध्ये उपलब्ध नोकरीच्या संधींची विषयी माहिती दिली आणि त्यासाठी आवश्यक तयारी कशी करावी, याबाबत महत्वपूर्ण मार्गदर्शन केले.
चर्चासत्र मध्ये सहभागी झालेले मार्गदर्शक हे सध्या ऑटोमेशन क्षेत्रामध्ये कार्यरत असुन ते एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ ऑफ पंढरपूर चे माजी विद्यार्थी आहेत.
हे चर्चासत्र यशस्वी करण्यासाठी प्रा. वैष्णवी उत्पात, प्रा. स्वप्नील टाकळे आदींसह इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग इंजिनिअरिंग विभागातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.