*पंढरपूर सिंहगडची सोनिया नवले पदव्युत्तर (एम.एस.) शिक्षणासाठी युनायटेड स्टेट्सला रवाना*
पंढरपूर: प्रतिनिधी
कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस.के.एन. सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्म्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागात शिक्षण पुर्ण केलेली कुमारी सोनिया दादासाहेब नवले ह्या नुकत्याच अभियांत्रिकीचे पदव्युत्तर (एम एस) शिक्षण घेणेसाठी युनायटेड स्टेट्स ला रवाना झाली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
एखतपुर (ता. सांगोला) येथील रहिवासी असलेली कुमारी सोनिया दादासाहेब नवले हिने एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्म्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागात पदवीचे शिक्षण पुर्ण केले होते. दरम्यान महाविद्यालयातील कॅम्पस प्लेसमेंट मधुन टेक महिंद्रा आणि ॲम्याझाॅन या दोन कंपनी निवड झाली होती. दरम्यान टीसीएस कंपनीत दोन वर्षे नोकरी केल्यानंतर पदव्युत्तर शिक्षणासाठी युनायटेड स्टेट्स येथील इलिनाॅईस विद्यापीठ अर्बना-चॅम्पेन येथे जात आहेत. युनायटेड स्टेट्स हे सर्वात प्रतिष्ठित संस्थापैकी एक असुन या युनिव्हर्सिटीत पंढरपूर सिंहगड मध्ये शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर (एम एस) शिक्षणासाठी संधी मिळत असल्याने पालक वर्गातून अभिनंदन व कौतुक होत आहे.
कुमारी सोनिया नवले हिच्या अमेरिकेतील पदव्युत्तर शिक्षणासाठी महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, डाॅ. अल्ताफ मुलाणी, डाॅ. समीर कटेकर, डाॅ. चेतन पिसे, डाॅ. शाम कुलकर्णी, डाॅ. बाळासाहेब गंधारे, डाॅ. अतुल आराध्ये, डाॅ. श्रीगणेश कदम, डाॅ. भालचंद्र गोडबोले, डाॅ. सुभाष पिंगळे, डाॅ. सोमनाथ कोळी, डाॅ. दिपक गानमोटे, डाॅ. संपत देशमुख, डाॅ. यशवंत पवार, प्रा. विनोदकुमार मोरे, प्रा. अनिल निकम आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.