*पंढरपूर सिंहगडच्या ११ विद्यार्थ्यांची "करमतारा इंजिनिअरिंग" प्राइवेट लिमिटेड कंपनीत निवड*
□ ३ लाख वार्षिक पॅकेज: कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड
पंढरपूर: प्रतिनिधी
करमतारा ही एक अभियांत्रिकी, उत्पादन आणि तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणारी बहुराष्ट्रीय कंपनी आहे. १९९८ मध्ये सुरू झालेल्या करमतारा इंजिनिअरिंग प्राइवेट लिमिटेड कंपनी जगातील बहुतेक वस्तूंसाठी एक स्टाॅप सोल्युशन कंपनी आहे. मॉड्यूल माउंटिंग स्ट्रक्चर्स, सौर ऊर्जेसाठी बीम आणि टॉर्क ट्यूब, पवन ऊर्जेसाठी विंड टॉवर, ट्रान्समिशन लाइन आणि टेलिकॉम टॉवर्स, हॉट रोल्ड हाय टेन्साइल (एचटी), माईल्ड स्टील (एमएस) स्ट्रक्चरल स्टील प्रोफाइल, एचटी, एमएस फास्टनर्स (बोल्ट, नट, वॉशर्स), ओएचटीएल हार्डवेअर फिटिंग, ॲक्सेसरीज आणि स्पेसर डॅम्पर्स आदींसह करमताराची कंपनी स्वतःची स्टील रोलिंग मिल आणि तिची सर्व उत्पादने मोठ्या प्रमाणावर उत्पादन करत आहे. अशा या कंपनीत पंढरपूर सिंहगड इंजिनिअरिंग काॅलेज मधील ११ विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड झाली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. करांडे यांनी दिली.
एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मधील इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातील सोहेल देशमुख, अक्षय नागणे, गणेश गायकवाड, महेश काळे, ऋषिकेश बुरांडे, यश स्वामी, तेजस खारे, निखिल जगताप मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील गणेश सकनुर, सुनिल दोलतडे,सिद्धेश्वर मोरे आदींसह ११ विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड झाली असुन कंपनीकडून वार्षिक ३ लाख पॅकेज मिळणार आहे.
मुंबई येथील करमतारा इंजिनिअरिंग प्राइवेट लिमिटेड कंपनीत निवड झाल्याबद्दल प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, डाॅ. चेतन पिसे, डाॅ. भालचंद्र गोडबोले, डाॅ. श्याम कुलकर्णी, डॉ. श्रीगणेश कदम, डाॅ. संपत देशमुख, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. अतुल आराध्ये, डाॅ. दिपक गानमोटे, डाॅ. सोमनाथ कोळी, डॉ. सुभाष पिंगळे, प्रा. अभिजित सवासे प्रा. अतुल कुलकर्णी प्रा. दत्तात्रय कोरके आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.