*पंढरपूर सिंहगडच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये पीसीबी डिझाइन या विषयावर कार्यशाळा*
पंढरपूर: प्रतिनिधी
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागात सोमवार दिनांक २६ ऑगस्ट २०२४ रोजी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग स्टुडंट्स असोसिएशन (EESA) ने विद्युत अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील कौशल्ये वाढवण्यासाठी पीसीबी डिझाइनवर या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ही कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाली असल्याची माहिती इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख प्रा. विनोदकुमार मोरे यांनी दिली.
इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागात आयोजित कार्यशाळेच्या सुरुवातीस प्रा. दत्तात्रय कोरके यांचे प्रा. प्रदीप व्यवहारे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यादरम्यान प्रा.स्वप्ना गोड, ईईएसए अध्यक्ष तेजस कुलकर्णी उपस्थित होते.
या समारंभात तेजस कुलकर्णी यांनी ईईएसएचा परिचय करून दिला आणि विद्युत अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या शिकण्याची आणि विकासाची ईईएसएची ध्येयधोरणे उपस्थित विद्यार्थ्यांना सांगितली.
दरम्यान कार्यशाळेचे प्रास्ताविक प्रा. प्रदीप व्यवहारे यांनी केले. या मध्ये मार्गदर्शक प्रा. दत्तात्रय कोरके यांनी विद्यार्थ्यांना महत्वपूर्ण मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत ६० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी पीसीबी डिझाइन करण्याचा अनुभव घेतला. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी अत्यावश्यक कौशल्य आहे. म्हणून ईईएसएच्या अशा महत्वपूर्ण सत्रांचे आयोजन विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या व्यावसायिक वाढीसाठी केल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदी वातावरण निर्माण झाले. या कार्यशाळेचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन कुमारी श्रध्दा पंधे यांनी केले.