पंढरपूर सिंहगड मध्ये इंजिनिअर ओंकार पवार यांचे गेट परीक्षा यावर व्याख्यान
पंढरपूर: प्रतिनिधी
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागात मंगळवार दिनांक २७ ऑगस्ट २०२४ रोजी इंजिनिअर ओंकार पवार यांचे गेट परीक्षेच्या संदर्भात व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. हे व्याख्यान मोठ्या उत्साहात संपन्न झाले असल्याची माहिती इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख प्रा. विनोदकुमार मोरे यांनी दिली.
सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागात आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानाचे प्रमुख व्याख्याते इंजिनिअर ओंकार पवार यांचे इंजिनिअर विनोदकुमार मोरे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
दरम्यान उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना इंजिनिअर ओंकार पवार यांनी गेट परीक्षेचा अभ्यास करत असताना प्रश्ननांची रचना, गुणांची पद्धत आणि विषयांच्या श्रेणी सह परीक्षेची संपुर्ण रचना विचार घेणे आवश्यक आहे. गेट परीक्षेची तयारी करत असताना पाठ्यपुस्तकाचा अभ्यास तसेच गेट परीक्षेशी संलग्न पाठ्यपुस्तकांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. हे सर्व करीत असतानाच अभ्यासाचे वेळापत्रक तयार करणे आवश्यक आहे. नियमित सराव आणि माॅक टेस्ट विद्यार्थ्यांनी दिल्या पाहिजेत. अभ्यास करीत असताना सामन्य चुका कशा टाळायला हव्यात याबद्दल सखोल मार्गदर्शन केले. या व्याख्यानातून विद्यार्थ्यांना गेट परीक्षेची तयारी कशी करावी? याबद्दल महत्वपूर्ण मार्गदर्शन मिळाले. या व्याख्यान इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातील १०० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते.
हे व्याख्यान यशस्वी करण्यासाठी प्रा. अंजली चांदणे सह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.