पंढरपूर सिंहगडच्या ६ विद्यार्थ्यांची "ट्रायन्झ डिजिटल" कंपनीत निवड* ○ कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड: वार्षिक ४.२५ लाख पॅकेजची नोकरी

 *पंढरपूर सिंहगडच्या ६ विद्यार्थ्यांची "ट्रायन्झ डिजिटल" कंपनीत निवड*


○ कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड: वार्षिक ४.२५ लाख पॅकेजची नोकरी



पंढरपूर: प्रतिनिधी


कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील अंतीम वर्षात शिक्षण घेत असतानाच ६ विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड झाली असल्याची माहिती प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे यांनी दिली.

   एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मध्ये चतुर्थ वर्षात शिक्षण घेत असतानाच इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागातील निखिल दिपक बागल, सोनाली सत्यवान मोरे, काॅम्प्युटर सायन्स अ‍ॅण्ड इंजिनिअरिंग विभागातील कांचन शिवाजी तनपुरे, कार्तिक दत्तात्रय बुंजकर, कपिल नवनाथ पिसे आणि प्रशिला प्रकाश माळी आदी सहा विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड झाली असुन निवड झालेल्या विद्यार्थ्यांना "ट्रायन्झ डिजिटल" कंपनीकडून वार्षिक ४.२५ लाख वार्षिक पॅकेज मिळणार आहे. हे विद्यार्थी नोव्हेंबर २०२४ मध्ये हैदराबाद व बंगलोर येथील ट्रायन्झ डिजिटल कंपनीत रुजू होणार आहेत.

   ट्रायन्झ डिजिटल कन्सल्टींग ही एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. या कंपनीने जगभरातील ५ हजार हून अधिक कंपन्यांच्या डेटासह डिजिटल ट्रान्सफाॅर्मेशनवरील सर्वात मोठा डेटा बेस तयार करण्यास गुंतवणूक केलेली आहे. अशा या कंपनीत सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील ६ विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड झाल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, डाॅ. चेतन पिसे, डाॅ. भालचंद्र गोडबोले, डाॅ. श्याम कुलकर्णी, डॉ. श्रीगणेश कदम, डाॅ. संपत देशमुख, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. अतुल आराध्ये, डाॅ. दिपक गानमोटे, डाॅ. सोमनाथ कोळी, डॉ. सुभाष पिंगळे, डाॅ. यशवंत पवार, डाॅ. सोमनाथ कोळी, प्रा. अभिजित सवासे, प्रा. वैभव गोडसे, प्रा. संदीप लिंगे आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.