पंढरपूर सिंहगडच्या ४ विद्यार्थ्यांची मित्सुबिशी इलेक्ट्रिक इंडिया प्रा. लि. कंपनीत निवड* वार्षिक ३.५ लाख पॅकेज: कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड पंढरपूर

 *पंढरपूर सिंहगडच्या ४ विद्यार्थ्यांची मित्सुबिशी इलेक्ट्रिक इंडिया प्रा. लि. कंपनीत निवड*


वार्षिक ३.५ लाख पॅकेज: कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड 



पंढरपूर: प्रतिनिधी 



एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मधील अंतीम वर्षात शिक्षण घेत असलेल्या ४ विद्यार्थ्यांची विद्यार्थ्यांची मित्सुबिशी इलेक्ट्रिक इंडिया प्रा. लि. कंपनीत कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड झाली असल्याची माहिती इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्म्युनिकेशन इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डाॅ. अल्ताफ मुलाणी यांनी दिली.

      मित्सुबिशी इलेक्ट्रिक इंडिया प्रा. लि. कंपनीत एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागातील कुमारी राशेश्वरी गजानन मेनकुदळे, उमेश तानाजी देठे, प्रमोद अनिल काशिद आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातील अर्पिता प्रमोद डुबल आदी ४ विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड झाली असुन निवड झालेल्या विद्यार्थ्यांना कंपनीकडून वार्षिक ३.५ लाख पॅकेज मिळणार आहे

मित्सुबिशी इलेक्ट्रिक इंडिया प्रा. लि. कंपन जापनीज बहुराष्ट्रीय नामांकित कंपनी आहे. या कंपनी मध्ये इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, एअर कंडिशन्ल, सेमी कंडक्टर आदी क्षेत्रात उत्पादन निर्मिती करून बाजारात विकते. इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स साधन सामग्री तयार करण्यास हि कंपनी अग्रेसर आहे.

 मित्सुबिशी इलेक्ट्रिक इंडिया प्रा. लि. कंपनीत ४ विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड झाल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, डाॅ. चेतन पिसे, डाॅ. भालचंद्र गोडबोले, डाॅ. श्याम कुलकर्णी, डॉ. श्रीगणेश कदम, डाॅ. संपत देशमुख, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. अतुल आराध्ये, डाॅ. दिपक गानमोटे, डाॅ. सोमनाथ कोळी, डॉ. सुभाष पिंगळे, डाॅ. यशवंत पवार, डाॅ. सोमनाथ कोळी, प्रा. अभिजित सवासे, प्रा. वैभव गोडसे, प्रा. दत्तात्रय कोरके आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad