*पंढरपूर सिंहगडच्या ३ "न्यूजेन साॅफ्टवेअर" कंपनीत निवड*
○ वार्षिक ४ लाख पॅकेज: कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड
पंढरपूर: प्रतिनिधी
"न्यूजेन साॅफ्टवेअर" ही कंपनी नेटिव्ह प्रोसेस ऑटोमेशन, कंटेंट सर्व्हिसेस आणि कम्युनिकेशन मॅनेजमेंट क्षमतांसह न्यूजेन ए आय सक्षम युनिफाइड डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन प्लॅटफॉर्म मध्ये अग्रेसर आहे. जागतिक स्तरावर, यशस्वी उपक्रम क्लाउडवर जटिल, सामग्री-चालित आणि ग्राहक-गुंतवणारे व्यवसाय अनुप्रयोग विकसित आणि तैनात करण्यासाठी न्यूजेनच्या उद्योग-मान्यता असलेल्या लो कोड ऍप्लिकेशन प्लॅटफॉर्मवर हि कंपनी सेवा प्रदान करते. ऑनबोर्डिंगपासून ते सेवा विनंत्या, कर्ज देण्यापासून ते अंडररायटिंगपर्यंत आणि अनेक उद्योगांमध्ये वापराच्या प्रकरणांसाठी "न्यूजेन साॅफ्टवेअर" कंपनी अग्रस्थानी आहे. अशा कंपनी मध्ये पंढरपूर सिंहगड इंजिनिअरिंग काॅलेज मधील ३ विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड झाली असल्याची माहिती इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डाॅ. अल्ताफ मुलाणी यांनी दिली.
कोर्टी (ता.पंढरपूर) एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागात चतुर्थ वर्षात शिक्षण घेत असतानाच सुजित हरिभाऊ बरले आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागातील सोनाली बापू मोटे व पल्लवी महादेव शिंदे यांची कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड झाली असुन कंपनीकडून वार्षिक ४ लाख पॅकेज मिळाले असुन मार्च २०२४ मध्ये मुंबई येथे रूजू झाले आहेत.
"न्यूजेन साॅफ्टवेअर" कंपनीत निवड झाल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, डाॅ. चेतन पिसे, डाॅ. भालचंद्र गोडबोले, डाॅ. श्याम कुलकर्णी, डॉ. श्रीगणेश कदम, डाॅ. संपत देशमुख, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. अतुल आराध्ये, डाॅ. दिपक गानमोटे, डाॅ. सोमनाथ कोळी, डॉ. सुभाष पिंगळे, डाॅ. यशवंत पवार, डाॅ. सोमनाथ कोळी, प्रा. अभिजित सवासे, प्रा. वैभव गोडसे, प्रा. अतुल कुलकर्णी आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.