प्रथम वर्ष इंजिनिअरिंगच्या कॅप राऊंड-३ चे ऑप्शन्स भरण्याची प्रकिया दि. ३१ ऑगस्ट पासून सुरु स्वेरी कडून सदर फॉर्म भरण्याची मोफत सुविधा विविध ठिकाणी उपलब्ध

 

प्रथम वर्ष इंजिनिअरिंगच्या कॅप राऊंड-३ चे ऑप्शन्स भरण्याची प्रकिया दि. ३१ ऑगस्ट पासून सुरु

स्वेरी कडून सदर फॉर्म भरण्याची मोफत सुविधा विविध ठिकाणी उपलब्ध



पंढरपूरः 'शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये प्रथम वर्ष पदवी इंजिनिअरिंग प्रवेशासाठी कॅप राऊंड-३ चे ऑप्शन्स भरण्याची प्रकिया दि. ३१ ऑगस्ट पासून सुरु होत असून स्वेरी कडून सदर फॉर्म भरण्याची मोफत सुविधा जिल्ह्यातील विविध ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. प्रवेशाच्या पहिल्या आणि दुसऱ्या फेरीमध्ये स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) ला विद्यार्थी व पालकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. स्वेरीतील विद्यार्थ्यांचे वार्षिक परीक्षांचे निकाल, कॅम्पस प्लेसमेंट मधून निवड होणाऱ्या विद्यार्थांची वाढती संख्या, शैक्षणिक व संशोधनाचे वातावरण, मिळालेली मानांकने, उपलब्ध सोयी-सुविधा, उच्च शिक्षित प्राध्यापक वर्ग या गोष्टींचा विद्यार्थी व पालकांनी प्रामुख्याने विचार केलेला दिसून येत आहे. एकूणच 'स्वेरीत प्रवेश मिळणे ही बाब आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी गरजेची असल्याचे पालकांनी व विद्यार्थ्यांनी पूर्णपणे ओळखले आहे, हेच आधीच्या प्रवेश फेऱ्यांमधून दिसून येते.’ असे प्रतिपादन पदवी अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेचे अधिष्ठाता प्रा.करण पाटील यांनी केले. 

          'शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी प्रथम वर्ष पदवी इंजिनिअरिंग प्रवेशाची तिसरी फेरी (थर्ड कॅप राऊंड) चे ऑप्शन फॉर्म भरण्याची प्रक्रिया शनिवार, दि. ३१ ऑगस्ट पासून ते सोमवार, दि.०२ सप्टेंबर २०२४ हे तीन दिवस चालणार आहे. ज्यांना पहिल्या आणि दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळाला नाही व ज्यांनी दुसऱ्या फेरीत नॉट फ्रीझ/ बेटरमेन्ट केले आहे त्यांना या तिसऱ्या फेरीचा लाभ घेता येणार आहे.’ अशी माहीती अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेचे अधिष्ठाता प्रा.करण पाटील यांनी दिली. सन २०२४-२५ च्या पदवी अभियांत्रिकीच्या प्रवेशाकरीता यापूर्वीच ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्म भरणे, भरलेले अर्ज स्विकारुन कागदपत्रांची तपासणी, पडताळणी, अर्ज निश्चित करणे आदी प्रक्रियानंतर ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी पहिल्या व दुसऱ्या प्रवेश फेरीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मागील दोन्ही फेरीत योग्य महाविद्यालय अथवा योग्य ब्रँच मिळाली नसेल अथवा कुठेच प्रवेश मिळाला नसेल अशा विद्यार्थ्यांसाठी तिसरी फेरी ही शेवटची संधी असणार आहे. त्यामुळे योग्य महाविद्यालय व योग्य अभ्यासक्रम (विभाग) याबाबतचे पसंतीक्रम ऑनलाईन भरावे लागणार आहेत. यासाठी मागील दोन कॅप राउंड मध्ये झालेल्या चूका टाळून व कट ऑफचा पूर्णपणे अभ्यास करून कॅप राऊंड-३ चे ऑप्शन फॉर्म भरणे गरजेचे आहे. ‘पालक व विद्यार्थ्यांनी महाविद्यालय निवडताना महाविद्यालयात दरवर्षी होणारे प्रवेश, विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे निकाल, कॅम्पस प्लेसमेंटची संख्या, कॅम्पस मधून मिळणारे संस्कार, शैक्षणिक वातावरण, सोयी-सुविधा, उच्च शिक्षित प्राध्यापक वर्ग या बाबींचा प्रामुख्याने विचार करणे आवश्यक आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी प्रवेश प्रक्रियेचे अधिष्ठाता प्रा.करण पाटील (९५९५९२११५४) व प्रा.उत्तम अनुसे (९१६८६५५३६५) या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad