*पंढरपूर सिंहगड मध्ये "अॅन्टी रॅगिंग पाॅश ॲक्ट, सायबर सेक्युरीटी आणि क्राईम" या विषयावर व्याख्यान*
पंढरपूर: प्रतिनिधी
एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मध्ये शुक्रवार दिनांक ३० ऑगस्ट २०२४ रोजी "अॅन्टी रॅगिंग पाॅश ॲक्ट, सायबर सेक्युरीटी आणि क्राईम" या विषयावर डाॅ. सीमा गायकवाड व ॲड. राजेश्वरी केदार यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या व्याख्यानात महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिंनी सहभागी झाले होते.
या व्याख्यानाची सुरवात डाॅ. सीमा गायकवाड व ॲड. राजेश्वरी केदार, प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, सावित्रीबाई फुले गर्ल्स फोरम च्या चेअरमन प्रा. अंजली पिसे, प्रा. अंजली चांदणे आदींच्या हस्ते सरस्वती पूजन करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मधिल सावित्रीबाई फुले गर्ल्स फोरम, अॅन्टी रॅगिंग कमिटी, महाराष्ट्र राज्य समाज कल्याण बोर्ड मुंबई व भारतीय स्त्री शक्ती संचलित मैञिण कुटुंब सल्ला केंद्र सांगोला आणि भारतीय स्ञी शक्ती शाखा सांगोला यांच्या संयुक्त विद्यमाने "अॅन्टी रॅगिंग पाॅश ॲक्ट, सायबर सेक्युरीटी आणि क्राईम" या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
या व्याख्यानात डाॅ. सिमा गायकवाड व ॲड. राजश्री केदार यांनी उपस्थित विद्यार्थ्याना लैगिक, मानसिक आणि शारीरिक क्षळ होत असेल तर पोलीस प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील प्रा. अंजली पिसे, अंजली चांदणे, प्रा. धनश्री भोसले, संगिता कुलकर्णी आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सुञसंचलन व आभार प्रदर्शन कुमारी गीता नवले आणि श्रेया सुपेकर यांनी मानले.