*मिशन साहसीच्या माध्यमातून सशक्त महाराष्ट्र घडवू- डाॅ. कैलाश करांडे*
○ पंढरपूर सिंहगड मध्ये मिशन साहसी उपक्रमांमधून मुलींना प्रशिक्षण
पंढरपूर: प्रतिनिधी
मिशन साहसीच्या माध्यमातून महाविद्यालयातील मुलींना प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. प्रत्येक महाविद्यालयातील मुलींना मिशन साहसीच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले तर ती सशक्त, सक्षम बनू शकेल याशिवाय स्वतःवर झालेल्या व होत असलेल्या अन्याय, अत्याचाराचा ती स्वतःच मोठ्या धाडसाने निपटारा करेल. यासाठी मिशन साहसीच्या माध्यमातून सशक्त महाराष्ट्र घडेल असे प्रतिपादन एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर चे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी यादरम्यान बोलताना व्यक्त केले.
कोर्टी (ता.पंढरपूर) एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील विद्यार्थिनींसाठी 'मिशन साहसी'
उपक्रमाच्या प्रात्यक्षिक कार्यक्रम शनिवार दिनांक ३१ ऑगस्ट २०२४ रोजी आयोजित करण्यात आला होता. यामध्ये देशात महिला व मुलींवर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध मोठी जागृती निर्माण व्हावी यासाठी मिशन साहसी कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांना सशक्त करून त्यांनी समाजातील वाईट प्रवृत्तीविरुद्ध लढण्यासाठी सज्ज होणेसाठी प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. मिशन साहसी उपक्रमामुळे महिलांवर हल्ला करणाऱ्यांना व त्यांच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचवणाऱ्यांना आळा बसणार आहे. म्हणून पंढरपूर सिंहगड इंजिनिअरिंग काॅलेजने मिशन साहसी उपक्रम राबून मुलींना प्रशिक्षण दिले आहे असे मत यादरम्यान प्राध्यापिका अंजली चांदणे यांनी यादरम्यान बोलताना मत व्यक्त केले.
सावित्रीबाई फुले गर्ल्स फोरम यांच्यावतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीस मिशन साहसीचे अशोक भोसले, अतुल चव्हाण आणि श्रेया कदम यांचा काॅलेज वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
यामध्ये प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डाॅ. स्वानंद कुलकर्णी, प्रा. अनिल निकम, प्रा.अंजली चांदणे, प्रा. अंजली पिसे, प्रा. सोनाली घोडके, प्रा. स्वप्ना गोड, संध्या शिंदे, माधुरी वाघमारे, रूपाली खंडागळे आदींनी परिश्रम घेतले.