पंढरपूर सिंहगडच्या ३ विद्यार्थिनींची आलोक इंगोट्स प्रा. लि. कंपनीत निवड* वार्षिक ३ लाख पॅकेज: कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड

 *पंढरपूर सिंहगडच्या ३ विद्यार्थिनींची आलोक इंगोट्स प्रा. लि. कंपनीत निवड*


वार्षिक ३ लाख पॅकेज: कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड 



पंढरपूर: प्रतिनिधी


मुंबई येथील आलोक इंगोट्स प्राइवेट लिमिटेड कंपनी हि स्टील उत्पादनाची उत्पादक आहे. २००५ मध्ये या कंपनीची स्थापना झाली असून हि अलाॅयज आणि स्टेनलेस स्टीलसच्या क्षेञात जागतिक दर्जाच्या गरजा पुर्ण करणारी एक उदयोन्मुख कंपनी आहे. हि कंपनी भारतातील सर्वात कार्यक्षम आणि किफायतशीर स्टील उत्पादक कंपनी म्हणून या कंपनीचा नावलौकिक आहे. भारतातील आणि जगभरातील अनेक उद्योजकांसाठी विशेष मिश्र धातू आणि स्टेनलेस स्टील अशी ३०० पेक्षा जास्त ग्रेड या कंपनीने विकसित केले आहेत. अशा कंपनीत एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मधील तीन विद्यार्थिनींची कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड झाली असल्याची माहिती मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ. श्याम कुलकर्णी यांनी दिली.

    कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मधील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील अंतिम वर्षात शिक्षण घेत असताना कुमारी प्रगती महालिंग दुधाळे, कुमारी निकिता विठ्ठल देठे आणि कुमारी निकिता कांतीलाल मेटकरी या विद्यार्थिनींची कॅम्पस प्लेसमेंट मधुन मुलाखती दिल्या होत्या. कॅम्पस प्लेसमेंट मधुन त्यांची मुंबई येथील "आलोक इंगोट्स प्राइवेट लिमिटेड" या कंपनीत कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड झाली असुन कंपनीकडून वार्षिक ३ लाख पगार मिळणार आहे.

    आलोक इंगोट्स प्राइवेट लिमिटेड कंपनीत निवड झाल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, डाॅ. चेतन पिसे, डाॅ. भालचंद्र गोडबोले, डाॅ. श्याम कुलकर्णी, डॉ. श्रीगणेश कदम, डाॅ. संपत देशमुख, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. अतुल आराध्ये, डाॅ. दिपक गानमोटे, डाॅ. सोमनाथ कोळी, डॉ. सुभाष पिंगळे, डाॅ. यशवंत पवार, डाॅ. सोमनाथ कोळी, प्रा. अभिजित सवासे, प्रा. अतुल कुलकर्णी आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.