*महात्मा फुले युवा मंचच्या वतीने वृक्षारोपण*
□ लक्ष्मी दहिवडीत ३१५ हून अधिक वृक्षांची लागवड: युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
लक्ष्मी दहिवडी: प्रमोद बनसोडे
बदलत्या निसर्गाने माणसांवर विचार करण्याची वेळ आणली आहे. आपण एकीकडे कल्पनेच्या पलीकडे गगनभरारी घेतली, प्रगती साध्य केली परंतु आपल्या कृतीने पर्यावरणाचा -हास होतोय याकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे. जागतिक तापमानातील वाढीमुळे पृथ्वीवरील मानवाचं, सजीवांचं अस्तित्व धोक्यात आलं आहे. वाढती लोकसंख्या, वाहनांचा अति वापर, त्यामुळे निर्माण होणाºया प्रदूषणामुळे शहरात श्वास घेणं कठीण झालंय. शुद्ध हवा, ऑक्सिजन हवा असेल तर झाडांशिवाय पर्याय नाही म्हणून लक्ष्मी दहिवडी (ता. मंगळवेढा) येथील महात्मा फुले युवा मंचच्या युवकांनी गावातील अनेक ठिकाणी ३१५ हून अधिक वृक्षारांची लागवड करून सामाजिक संदेश दिल्याने महात्मा फुले युवा मंचचे सर्वञ कौतुक होत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील तरुणांना मार्गदर्शन पर उपक्रम राबवत असलेले महात्मा फुले युवा मंच यांनी रविवार दिनांक २५ ऑगस्ट २०२४ रोजी जिल्हा परिषद विभागातील कर्मचारी नागन्नाथ गुंजेगावकर व पोलीस विभागातील विलास बनसोडे यांनी महात्मा फुले युवा मंच या सामाजिक संस्थेला वृक्षारोपण करण्यासाठी झाडे उपलब्ध करून दिली. या मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वृक्षांची जेसीबी द्वारे खड्डे काढून रोप लावण्यात आली. दरम्यान ग्रामपंचायत च्या वतीने लावलेल्या झाडांना पाणी देणेसाठी मोफत टँकर उपलब्ध करून देण्यात आला.
वृक्ष संवर्धन समितीच्या वतीने झाडांच्या संरक्षणासाठी काट्यावर व संरक्षण कुंपण देण्यात आले. महात्मा फुले युवा मंचच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेऊन हा वृक्षारोपण कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पाडला. या वृक्षारोपण कार्यक्रम गावातील अनेक तरूण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित झाला होता. महात्मा फुले युवा मंचचे आयोजित केलेल्या या उपक्रमांचे पंचक्रोशीत कौतुक होत आहे.
हा कार्यक्रम यशस्वी करणेसाठी अनिल बनसोडे, विलास बनसोडे दत्तात्रय सावकर, दत्तात्रय कोरे, विजय बनसोडे, किरण बनसोडे, मोहन वाघमारे, विनोद बनसोडे, बाळासाहेब बनसोडे, राजकुमार टाकळे, दगडू माळी, नवनाथ बनसोडे, अविनाश बनसोडे, नितीन बनसोडे, हर्षल जाधव, सुनिल बनसोडे, श्रीमंत बनसोडे, डाॅ. लखन बनसोडे, उमेश बुरकुल, पोपट टाकळे, अशोक बनसोडे आदींसह अनेक युवकांनी परीश्रम घेतले.
फोटो ओळी: लक्ष्मी दहिवडी येथे वृक्षारोपण प्रसंगी महात्मा फुले युवा मंच पदाधिकारी व कार्यकर्ते
कोट
सामाजिक भान डोळ्यासमोर ठेवून महात्मा फुले युवा मंचच्या माध्यमातून वाचनालय तसेच सामाजिक जबाबदारीची जाणीव व कर्तव्य लक्षात घेऊन वृक्षारोपण केले आहे. भविष्यात देशाच्या व समाजाच्या हितासाठी सामाजिक कार्यक्रम राबविणार आहोत.
अनिल बनसोडे
संस्थापक अध्यक्ष महात्मा फुले युवा मंच लक्ष्मी दहिवडी.