पंढरपूर सिंहगडच्या ६ विद्यार्थ्याची “टीई कनेक्टिव्हिटी” या कंपनीत निवड* ○ वार्षिक ३ लाख पॅकेज: कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड

 *पंढरपूर सिंहगडच्या ६ विद्यार्थ्याची “टीई कनेक्टिव्हिटी” या कंपनीत निवड*


○ वार्षिक ३ लाख पॅकेज: कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड



पंढरपूर: प्रतिनिधी


        कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज इंजिनिअरिंग महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागात अंतिम वर्षात शिक्षण घेत असतानाच ६ विद्यार्थ्यांची "टीई कनेक्टिव्हिटी” या कंपनीत कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड झाली असल्याची माहिती मेकॅनिकल इंजिनिअरींग विभाग प्रमुख डॉ. श्याम कुलकर्णी यांनी दिली.

          “टीई कनेक्टिव्हिटी” ही एक अमेरिकन स्विस-प्रवासी तंत्रज्ञान कंपनी आहे. जी ऑटोमोटिव्ह, औद्योगिक उपकरणे, डेटा कम्युनिकेशन सिस्टम, एरोस्पेस, डिफेन्स, मेडिकल, ऑइल एंड गॅस, कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स अशा विविध उद्योगांमधील कठोर वातावरणासाठी कनेक्टिव्हिटी आणि सेन्सर उत्पादनांची रचना आणि उत्पादन करते. अशा या कंपनीत पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी मधील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील अविनाश बन्सी रेडे, वैभव सचिन धुमाळ, संकेत सत्यवान फडतरे, संदीप अशोक क्षीरसागर, अदिनाथ लक्ष्मण साळुंखे आणि आशुतोष ज्ञानेश्वर कोरे आदी ६ विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड झाली असुन कंपनीकडून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना वार्षिक ३ लाख पॅकेज मिळणार आहे.

      “टीई कनेक्टिव्हिटी” या कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, डॉ. श्याम कुलकर्णी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. अल्ताफ मुलाणी, डाॅ. संपत देशमुख, डॉ. श्रीगणेश कदम, डॉ. चेतन पिसे, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. समीर कटेकर, डाॅ. अतुल आराध्ये, डाॅ. श्रीगणेश कदम, डाॅ. यशवंत पवार, डाॅ. सोमनाथ कोळी, डाॅ. दिपक गानमोटे, प्रा. अनिल निकम, प्रा. अभिजित सवासे, प्रा. अतुल कुलकर्णी आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad