पंढरपुरातील 780 रुग्णांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया संपन्न : प्रणव परिचारक कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांच्या पुण्यतिथीनिमित्त नेत्र तपासणी शिबिरामध्ये 3200 रुग्णांचा सहभाग

 पंढरपुरातील 780 रुग्णांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया संपन्न : प्रणव परिचारक 


कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांच्या पुण्यतिथीनिमित्त नेत्र तपासणी शिबिरामध्ये 3200 रुग्णांचा सहभाग 



पंढरपूर दि 25 ऑगस्ट 2024 


कर्मवीर सुधाकरपंत परिचारक यांच्या पुण्यतिथी निमित्त पंढरपूर तालुक्यातील 3200 इतक्या रुग्णांची नेत्र तपासणी तर सुमारे 780 रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया संपन्न झाली असल्याची माहिती युवा नेते प्रणव परिचारक यांनी दिली. 


पांडुरंग परिवार युवक आघाडी आणि प्रणव परिचारक युवा मंच यांच्या वतीने पंढरपूर तालुक्यातील आठह जिल्हा परिषद गटांमध्ये नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शास्त्रक्रीया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्राथमिक आरोग्य केंद्र आणि करकम येथील ग्रामीण रुग्णालय अशा नऊ ठिकाणी हे शिबिर संपन्न झाले. पुण्यातील एच व्ही देसाई नेत्र रुग्णालय यांच्या सहकार्यातून आणि पांडुरंग परिवाराच्या पुढाकारात ग्रामीण भागातील नागरिकांसाठी नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा समारोप नुकताच कासेगाव येथे झाला.


पांडुरंग परिवाराच्या माध्यमातून दृष्टी अभियान हे सुरू करण्यात आले आहे. पंढरपूर तालुका मोतीबिंदू मुक्त करण्याचा संकल्प प्रणव परिचारक यांनी केला आहे. या माध्यमातूनच या शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये आत्तापर्यंत 12,300 रुग्णांची तपासणी गेल्या चार वर्षात झाली. तर 4 हजार 700 रुग्णांचे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर हे करण्यात आले आहे. यंदाही या शिबिरांमध्ये तब्बल 3200 रुग्णांची तपासणी झाली. तर 780 गुणांची पुणे येथे शस्त्रक्रिया संपन्न झाली आहे. यामध्ये डोळ्यातील मास वाढलेल्या 56 रुग्णांची वेगळी आणि यशस्वी शस्त्रक्रिया या शिबिराच्या माध्यमातून संपन्न झाली. 


आमदार प्रशांतराव परिचारक, उमेशराव परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रणव परिचारक यांच्या माध्यमातून पांडुरंग परिवाराच्या वतीने या शिबिरांचे आयोजन होते आहे. पंढरपूर तालुक्यातील शंभरहून अधिक गावातील रुग्णांनी या शिबिरामध्ये सहभाग नोंदवला. सलग चार वर्षे कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रणव परिचारक घेत असलेले नेत्र शिबिर ग्रामीण भागातील रुग्णांसाठी वरदायिनी ठरत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad