पंढरपूर सिंहगडच्या सिव्हिल इंजिनीअरिंग विभागातील ९ विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड* □ वार्षिक ३ लाख पॅकेज: कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड

 *पंढरपूर सिंहगडच्या सिव्हिल इंजिनीअरिंग विभागातील ९ विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड*


□ वार्षिक ३ लाख पॅकेज: कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड 



पंढरपूर: प्रतिनिधी


कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील सिव्हिल इंजिनीअरिंग विभागात शिक्षण पुर्ण केलेल्या ९ विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड झाली असल्याची माहिती सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डाॅ. श्रीगणेश कदम यांनी दिली.

 एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मधील सिव्हिल इंजिनीअरिंग विभागात शिक्षण घेतलेले कुमारी अचल लहू एखतपुरे, जान्हवी सुधाकर चव्हाण, नवनाथ अशोक वाघमारे, उल्का उन्मेष शेटे, सोमनाथ महादेव मिसाळ, ऋतुजा राजेंद्र नाईकनवरे, आरती संजय लावंड, अक्षय मोहन माळी, रणजित आदलिंगे आदी ९ विद्यार्थ्यांची कॅशेक इंजिनिअर्स प्राइवेट लिमिटेड कंपनीत कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड झाली आहे. कंपनीकडून वार्षिक ३ लाख पॅकेज विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

   कॅशेक इंजिनिअर्स प्राइवेट लिमिटेड ही पुणे येथील नामांकित बहुराष्ट्रीय सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातील स्ट्रक्चरल डिझाईन क्षेत्रात सेवा देणारी कंपनी आहे. ही कंपनी कॅड सेवा, प्रोजेक्ट मॅनेजमेंट, फ्लाय ओव्हर्स, महामार्ग, सर्व आकारांचे विशेष बांधकाम प्रकल्प आदी क्षेत्रात सेवा प्रदान करत आहे.

कॅशेक इंजिनिअर्स प्राइवेट लिमिटेड कंपनीत निवड झाल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, डाॅ. चेतन पिसे, डाॅ. भालचंद्र गोडबोले, डाॅ. श्याम कुलकर्णी, डॉ. श्रीगणेश कदम, डाॅ. संपत देशमुख, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. अतुल आराध्ये, डाॅ. दिपक गानमोटे, डाॅ. सोमनाथ कोळी, डॉ. सुभाष पिंगळे, प्रा. अभिजित सवासे, प्रा. अमोल कांबळे आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad