स्वेरीमध्ये प्रथम वर्ष बी.फार्मसी प्रवेशासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू! दि. १४ ऑगस्ट, २०२४ पर्यंत चालणार प्रक्रिया!


स्वेरीमध्ये प्रथम वर्ष बी.फार्मसी प्रवेशासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू!

दि. १४ ऑगस्ट, २०२४ पर्यंत चालणार प्रक्रिया!



पंढरपूरः शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करीता प्रथम वर्ष बी.फार्मसीच्या (पदवी) प्रवेशासाठी येथील स्वेरीच्या बी.फार्मसी महाविद्यालयात स्क्रूटिनी सेंटर (एस.सी.क्र.-६३९७) या केंद्राला मा.संचालक, तंत्रशिक्षण संचालनालय, मुंबई यांनी मान्यता दिली आहे. गुरुवार, दि. ०८ ऑगस्ट, २०२४ पासून ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणे, कागदपत्रे पडताळणी व छाननी आदी बाबी सुरू झाल्या असून रजिस्ट्रेशनची ही प्रक्रिया बुधवार, दि. १४ ऑगस्ट, २०२४ पर्यंत चालणार आहे. त्यानंतर बी.फार्मसी कॉलेज निवडण्याची ऑनलाईन प्रक्रिया सुरु होईल.’ अशी माहिती स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी.रोंगे यांनी दिली. 

             गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित बी.फार्मसी (पदवी) महाविद्यालयात प्रथम वर्ष प्रवेशासाठीची रजिस्ट्रेशन प्रक्रिया गुरुवार, दि. ०८ ऑगस्ट, २०२४ पासून सुरू झाली असून ही प्रक्रिया बुधवार, दि. १४ ऑगस्ट, २०२४ पर्यंत चालणार आहे. या कालावधीत ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणे, कागदपत्रे, प्रमाणपत्रे पडताळणी व छाननी आदी प्रक्रिया चालणार आहेत. रजिस्ट्रेशनची तात्पुरती यादी दि. १९ ऑगस्ट रोजी तर ‘अंतिम यादी’ दि. २४ ऑगस्ट, २०२४ रोजी तंत्रशिक्षण संचालनालयाच्या संकेतस्थळावर जाहीर होईल तसेच तात्पुरत्या यादीनंतर विद्यार्थ्यांचे चुकलेले अर्ज दुरुस्त करून घेण्यासाठी दि. २० ऑगस्ट ते दि. २२ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत हा कालावधी असणार आहे. प्रवेशाच्या प्रक्रियेसाठी आवश्यक यंत्रणेसह स्वेरी फार्मसी सज्ज झाली आहे. स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ. बी. पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वेरीमध्ये बी.फार्मसीची स्थापना २००६ साली झाली असून बी.फार्मसी प्रथम वर्षाचे प्रवेश फॉर्म भरण्याकरीता पंढरपूर पंचक्रोशीतील व ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी सोलापूर, सांगली, पुणे अशा ठिकाणी जात होते. स्वेरीमध्ये ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया केंद्र झाल्यामुळे विद्यार्थ्यांना आता इतरत्र जावे लागणार नाही. स्वेरी फार्मसी महाविद्यालयाचा शैक्षणिक क्षेत्रातील चौफेर विकास पाहून तंत्रशिक्षण संचालकांनी स्वेरी बी.फार्मसीला प्रवेश प्रक्रिया केंद्र (एफ.सी. क्र.-६३९७) केंद्र म्हणून मान्यता दिली आहे. या बी. फार्मसी प्रवेश प्रक्रियेचा लाभ बारावी सायन्स उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना घेता येईल. प्रवेश प्रक्रियेच्या अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी प्रशासनाच्या http://www.mahacet.org/ या संकेतस्थळाला भेट द्यावी. यासंबंधी अधिक माहितीसाठी बी.फार्मसी प्रवेश प्रक्रिया केंद्राचे प्रभारी प्रा. हेमंत बनसोडे (मोबा.क्र ८८३०९८७३७८) व डॉ. वृणाल मोरे (मोबा.क्र-९६६५१९६६६६) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन बी.फार्मसीचे प्राचार्य डॉ. मिथुन मणियार यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad