*पंढरपूर सिंहगड मध्ये उद्या पासून प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या प्रवेशासाठी कॅप राऊंड-१ चे ऑप्शन फॉर्म भरण्याची मोफत सुविधा उपलब्ध*
पंढरपूर: प्रतिनिधी
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी प्रथम वर्ष इंजिनिअरिंग फर्स्ट कॅप राऊंड चे ऑप्शन फॉर्म भरण्याची सुरवात उद्या शुक्रवार दि.०९ ऑगस्ट २०२४ पासून ते रविवार, दि.११ ऑगस्ट २०२४ पर्यंत चालणार आहे. या कालावधीत पंढरपूर सिंहगड इंजिनिअरिंग काॅलेज मध्ये ऑनलाईन ऑप्शन फॉर्म भरण्याची सोय करण्यात आली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
प्रथम वर्ष इंजिनिअरिंगच्या पहिल्या प्रवेश फेरीची अलॉटमेंट यादी अधिकृत संकेतस्थळावर बुधवार दि. १४ ऑगस्ट, २०२४ रोजी प्रसिद्ध होणार आहे. ज्यांनी पदवी अभियांत्रिकी प्रवेशासाठी रजिस्ट्रेशन, डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन आणि कन्फर्मेशन केले आहे त्यांना या प्रवेश फेरीचा लाभ घेता येणार आहे.
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये पदवी अभियांत्रिकीच्या प्रवेशाकरीता ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे, भरलेले अर्ज स्विकारुन कागदपत्रांची तपासणी, पडताळणी, व निश्चिती करणे आदी प्रक्रिया पूर्ण झाल्या, त्यानंतर या प्रक्रियेला मुदतवाढही देण्यात आली होती व त्यानंतर तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली. पुढे प्रवेश अर्जातील चुका व त्रुटींची दुरुस्ती (ग्रीव्हेंन्स) करण्याची प्रशासनाकडून मुभा देण्यात आली होती. या सर्व प्रक्रीयेनंतर पहिली फेरी (फर्स्ट कॅप राऊंड) चे ऑप्शन फॉर्म भरण्याची प्रक्रिया शुक्रवार, दि.०९ ऑगस्ट, २०२४ पासून ते रविवार, दि.११ ऑगस्ट, २०२४ पर्यंत या तीन दिवसात होणार आहे. या पहिल्या फेरीमध्ये योग्य आणि पसंतीचे महाविद्यालय अथवा योग्य ब्रँच बाबतचे पसंतीक्रम ऑनलाईन भरावे लागणार आहेत. यासाठी विद्यार्थी व पालकांनी पूर्णपणे अभ्यास करून कॅप राऊंड-१ चे ऑप्शन फॉर्म भरणे अत्यंत आवश्यक असुन फाॅर्म भरताना विद्यार्थ्यांकडून चुका होऊ नये यासाठी एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मध्ये विद्यार्थ्यांना ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे