वीर धरणातून नीरा उजवा कालव्याद्वारे पाणी सोडा : आ. समाधान आवताडे
वीर धरणातून वाहून जाणारे पाणी नीरा उजवा कालव्याव्दारे पंढरपूर तालुक्याला सोडण्याची पाठबंधारे विभाग सकारात्मक
पंढरपूर :
सद्या वीर धरणातून नीरा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु करण्यात आला आहे. हे पाणी नदीद्वारे वाहून जात आहे. हे पाणी निरा उजवा कालव्याद्वारे पंढरपूर तालुक्यातील लाक्षत्रेक्षात मिळवून द्यावे. यामुळे नीरा उजवा कालवा लाभक्षेत्रातील गावे, तिसंगी मध्यम प्रकल्प, बंधारे, पाझर तलाव, साठवण तलाव, पूर्ण क्षमतेने भरून घेता येतील. शेतकर्यांच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. तसेच भुजल पातळी वाढण्यास मदत होणार आहे. त्यामुळे वीर धरणातून नीरा नदीत सोडलेले पाणी नीरा उजवा काल्यातून पंढरपूर तालुक्याला उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी आमदार समाधान आवताडे यांनी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक मा.कपोले सो यांच्याकडे केली आहे.
दरम्यान, या मागनिची दखल घेत पाणी सोडण्याची मागणी मान्य केली आहे.
पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघातील पंढरपूर तालुक्यामध्ये नीरा उजवा कालव्याद्वारे रांझणी, अनवली, एकलासपूर, तावशी, उंबरगाव, बोहाळी, कासेगाव, कोर्टी, टाकळी, वाखरी, इसबावी, खर्डी, त.शेटफळ, तनाळी, गादेगाव व तिसंगी मध्यम प्रकल्पास लाभ मिळतो. परंतु तालुक्यातील लाभ क्षेत्रातील शेतकर्यांनी वारंवार मागणी केली. मी स्वत: फोनद्वारे, पत्राद्वारे तसेच पाणी वाटप नियोजन बैठकी देखील अनेक वेळा पाणी देण्याबाबत मागणी केली आहे. परंतु,वीर धरणात पाणी कमी असल्याने व अधिकार्याच्या योग्य नियोजन अभावी शेतकर्यांना पुरेसे प्रमाणात पाणी मिळाले नाही. तसेच गादेगाव, वाखरी, कोर्टी, बोहाळी, टाकळी व उंबरगाव या सहा गावांना शेवटचे अवर्तन मिळाले नाही. यामुळे शेतकर्याच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तरी या सहा गावांना प्राधान्याने पाणी मिळावे. सद्या पावसाळा सुरु असून धरण लाभक्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. नीरा नदी दुथडी भरून वाहत असून पूर परस्थिती निर्माण होत आहे. परंतु, पंढरपूर तालुक्यातील काही भागामध्ये कमी पाऊस पडल्यामुळे पाण्याची कमतरता भासत आहे.
तरी नीरा नदीतून वाहून जाणारे पाणी नीरा उजवा कालव्याद्वारे पंढरपूर भागाला दिले तर या लाभक्षेत्रातील गावे, तिसंगी मध्यम प्रकल्प, बंधारे, पाझर तलाव, साठवण तलाव, पूर्ण क्षमतेने भरून घेता येतील. या भगातील भूजल पातळी वाढण्यास मदत होईल. तरी या मागणीची दखल घेवून वीर धरणातून नीरा नदीतील वाहून जात असलेले पाणी नीरा उजवा कालव्याद्वारे पंढरपूर तालुक्याला देण्याबाबत तात्काळ आदेश देण्यात यावेत. अशी मागणी आमदार समाधान आवताडे यांनी महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक कपोले यांना केली आहे. मागनी माण्य झाल्याने शेतकर्यांमधून या मागणीचे समाधान व्यक्त केले जात आहे.
.........................................................................................................