*पंढरपूर सिंहगड मध्ये "शिक्षण सर्वांसाठी, समृद्ध महाराष्ट्रासाठी" या विषयावर ऑनलाईन वेबिनार*
पंढरपूर: प्रतिनिधी
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये गुरुवार दिनांक २५ जुलै २०२४ रोजी सावित्रीबाई फुले गर्ल्स फोरम आयोजित विद्यार्थिनींसाठी "शिक्षण सर्वांसाठी, समृद्ध महाराष्ट्रासाठी" या विषयावर ऑनलाईन वेबिनार सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आले होते अशी माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
"शिक्षण सर्वांसाठी, समृद्ध महाराष्ट्रासाठी" या विषयावर उच्च व तंत्रशिक्षण मंञी चंद्रकांतदादा पाटील यांचे ऑनलाईन वेबिनार आयोजित करण्यात आले होते. या वेबिनार मध्ये बोलताना मंञी चंद्रकांतदादा पाटील यांनी ज्या मुलींच्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न रू. ८.०० लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या आर्थिक दुर्बल घटकांतील, इतर मागास प्रवर्गातील, सामाजिक व शैक्षणिकदृष्टय़ा मागास प्रवर्गातील नवीन प्रवेशित तसेच पूर्वीपासून प्रवेशित असलेल्या मुलींना, उच्च व तंत्रशिक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास आणि मत्स्यव्यवसाय विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभाग या विभागांकडून सध्या देण्यात येणाऱ्या शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या ५० टक्के लाभा ऐवजी १०० टक्के लाभ देण्यास शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे. असे मत यादरम्यान उच्च व तंत्रशिक्षण मंञी चंद्रकांतदादा पाटील यांनी ऑनलाईन वेबिनार द्वारे विद्यार्थ्यांनीना महत्वपूर्ण मार्गदर्शन केले.
हा वेबिनार यशस्वी करण्यासाठी सावित्रीबाई फुले गर्ल्स फोरम च्या चेअरमन प्रा. अंजली पिसे, प्रा. अंजली चांदणे आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.