*पंढरपूर सिंहगड मध्ये "ॲडव्हान्स कन्सेप्ट इन जावा" विषयावर सेमिनार*
पंढरपूर: प्रतिनिधी
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग मधील काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभागात बुधवार दिनांक जुलै २०२४ रोजी "ॲडव्हान्स कन्सेप्ट इन जावा" या विषयावर सेमिनार आयोजित करण्यात आली होते हे सेमिनार मोठ्या उत्साहात संपन्न झाले असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
महाविद्यालयातील काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभागातील विद्यार्थ्यांसाठी संतोष ढेरे यांचे "ॲडव्हान्स कन्सेप्ट इन जावा" याविषयावर मार्गदर्शन लाभले. या कार्यशाळेत प्रा. संतोष ढेरे यांनी ॲडव्हान्स आणि बेसिक कन्सेप्ट ऑफ जावा उप्स कन्सेप्ट आदीं विषयी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले तसेच प्रात्यक्षिक दाखवून विद्यार्थ्यांकडून प्रात्यक्षिक करून घेतले.
हि कार्यशाळा काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभागातील अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत महाविद्यालयातील १०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
हि कार्यशाळा विद्यार्थ्यांना भविष्यातील करिअरसाठी उपयुक्त ठरणार आहे. या कार्यशाळेचे सुञसंचलन व आभार प्रदर्शन प्रा. संदीप लिंगे यांनी केले. ही कार्यशाळा काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभाग प्रमुख डाॅ. सुभाष पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती.
ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभागातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.