स्वेरीच्या विद्यार्थ्यांनी घेतला ‘शिक्षण सर्वांसाठी, समृद्ध महाराष्ट्रासाठी' या सत्राचा आनंद उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली शैक्षणिक माहिती

 

स्वेरीच्या विद्यार्थ्यांनी घेतला ‘शिक्षण सर्वांसाठी, समृद्ध महाराष्ट्रासाठी' या सत्राचा आनंद

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली शैक्षणिक माहिती




पंढरपूर– महाराष्ट्र राज्यातील पदवी व पदव्युत्तर पदवी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यासाठी राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागातर्फे ‘शिक्षण सर्वांसाठी, समृद्ध महाराष्ट्रासाठी' या कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना.चंद्रकांतदादा पाटील यांनी विद्यार्थ्यांबरोबर थेट संवाद साधला. ना.पाटील यांनी आपल्या शैक्षणिक माहितीमधून उच्च व तंत्रशिक्षणाच्या नवीन योजना व धोरणासंबंधी विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले. 

         स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज डॉ.एम.एम.पवार, अभियांत्रिकीच्या उपप्राचार्य डॉ.मिनाक्षी पवार, बी.फार्मसीचे प्राचार्य डॉ. मिथुन मणियार, डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.एन.डी.मिसाळ, डी.फार्मसीचे प्राचार्य प्रा. सतीश मांडवे, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ.महेश मठपती यांच्या नेतृत्वाखाली स्वेरीच्या अभियांत्रिकी (पदवी व पदविका) व फार्मसी (पदवी व पदविका) महाविद्यालयात या थेट प्रक्षेपण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. प्रत्येक वर्गात एल.सी.डी. प्रोजेक्टरद्वारे या उच्च व तंत्रशिक्षण संबंधीत कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपणाचे आयोजन केले होते. स्वेरीच्या इंटरनॅशनल कॉन्फरन्स हॉल, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट हॉल तसेच इंजिनिअरिंग कॉलेजच्या प्रत्येक वर्गामध्ये हा कार्यक्रम थेट प्रक्षेपणाद्वारे पाहण्याची सोय करण्यात आली होती. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उच्चशिक्षण क्षेत्रातील प्रगती, नवनवीन अभ्यासक्रम, मुलींना मोफत शिक्षण, स्वयं योजना, स्पर्धा परीक्षा, विद्यार्थ्यांसाठी विविध कल्याणकारी योजना याबाबत सखोल माहिती दिली. त्यांच्या समवेत शिक्षण मंडळाचे श्री. सावे यांनी देखील विविध योजनांची माहिती दिली. ना.पाटील यांनी जवळपास दीड तास केलेल्या मार्गदर्शनानंतर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळाली. अभियांत्रिकीच्या व फार्मसीच्या प्रथम वर्षापासून ते अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनीही या थेट प्रक्षेपण कार्यक्रमाचा लाभ घेतला. विद्यार्थ्यांनी मान्यवरांचे उच्चशिक्षणाविषयीचे विचार वर्गात बसून तन्मयतेने ऐकले. प्रवेशासाठी आलेले विद्यार्थी व पालकांना देखील या शैक्षणिक कार्यक्रमाचा लाभ घेता आला. ना. पाटील यांच्या महत्वाच्या विचारांमुळे स्वेरीच्या विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या ज्ञानात नक्कीच भर पडली. हा थेट प्रक्षेपणाचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad