*पंढरपूर सिंहगडच्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागात एक दिवसीय कार्यशाळा*
पंढरपूर: प्रतिनिधी
पंढरपूर सिंहगड च्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागात आर सी सी कॉलम, बिम, स्लॅबचे डिझाईन, इस्टीमेट व स्टील बांधणी संदर्भात एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना इमारतींमधील विविध भागांचे आरसीसी कामामध्ये लागणाऱ्या स्टील चे मोजमाप, त्याची स्टील बार व्यासानुसार संख्या व वजन मोजमाप काढणे व ड्रॉइंग प्रमाणे सळई बांधणे याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. या कार्यशाळेसाठी पंढरपूर येथील प्रसिद्ध अभियंते भारत ढोबळे यांचे बहुमूल्य योगदान लाभले.
ही कार्यशाळा महाविद्यालयाचे उपक्रमशील प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, अधिष्ठाता डॉ. चेतन पिसे, विभाग प्रमुख डॉ.श्रीगणेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेसाठी डॉ. यशवंत पवार, प्रा. गणेश लकडे, प्रा. सिद्धेश पवार, प्रा. मिलिंद तोंडसे व मिस्त्री श्री. गणेश कोळी यांनी मार्गदर्शन केले.
ही कार्यशाळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले अशी माहिती कार्यशाळेचे समन्वयक प्रा. गणेश लकडे यांनी दिली.